चेन्नई : भारताविरुद्ध चौथ्या वनडेत सामना जिंकून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी दवडणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने मुंबईतील निर्णायक सामन्यात पाहुणा संघ मुसंडी मारणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.११२ धावांच्या शतकी खेळीनंतरही संघाला विजय मिळवून देता न आल्याने निराश झालेला दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार म्हणाला, ‘‘आमच्याजवळ मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी होती; परंतु आम्ही ती दवडली. मुंबईत चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे मालिका २-२ अशी बरोबरीत आहे.’’नाणेफेकीच्या कौलाच्या परिणामाविषयी तो म्हणाला, सामन्यात नाणेफेकीचा काही परिणाम झाला असे मला वाटत नाही. ही काट्याची लढत होती आणि दोन्ही संघांनी संघर्ष केला. हा एक चांगला सामना होता आणि आमच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला. ही कठीण खेळपट्टी होती आणि विराट कोहलीने खेळपट्टी लक्षात घेऊन फलंदाजी केली. चेंडू चांगला फिरकी घेत होता आम्ही खूप मेहनत घेतली आणि मुंबईत आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून मैदानात उतरू याचा मला विश्वास वाटतो.’’ (वृत्तसंस्था)
मुंबईत बाजी मारणार : डिव्हिलियर्स
By admin | Updated: October 24, 2015 04:14 IST