युसूफ पठाणच्या चाहत्यांची निराशा, बीसीसीआयचा दणका

By admin | Published: February 16, 2017 12:36 PM2017-02-16T12:36:56+5:302017-02-16T12:36:56+5:30

हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारत बीसीसीआयने भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला चांगलाच झटका दिला आहे

The disappointment of Yusuf Pathan's fans, the BCCI's bump | युसूफ पठाणच्या चाहत्यांची निराशा, बीसीसीआयचा दणका

युसूफ पठाणच्या चाहत्यांची निराशा, बीसीसीआयचा दणका

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यास परवानगी नाकारत बीसीसीआयने भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणला चांगलाच झटका दिला आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने आपल्याला हाँगकाँग टी 20 क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिलं असल्याचा दावा युसूफ पठाणने केला होता. पण असं कोणतंच प्रमाणपत्र दिलं नसल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे. हाँगकाँग ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या दुसऱ्या सत्राला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. 
 
युसूफ हा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून हाँगकाँग लीगमध्ये खेळणार होता. मात्र ती टी 20 लीग असल्यामुळे त्याला नाहरकत प्रमाणपत्र दिलं नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या लीगमध्ये युसूफ पठाण कोवलून कॅन्टॉन्सचं प्रतिनिधित्व करणार होता. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आणि इंग्लंडचा टायमल मिल्स यांच्यानंतर युसूफ पठाण हा कोवलून कॅन्टॉन्सचा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
 

Web Title: The disappointment of Yusuf Pathan's fans, the BCCI's bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.