नूर-सुल्तान (कजाखस्तान) : रवीने विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतातर्फे पहिला विजय नोंदविला; पण त्यानंतर त्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे रविवारी येथे भारताच्या ग्रीको रोमन मल्लांची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. तीन वजन गटात आॅलिम्पिक कोटा निश्चित होणार होता;पण तीनही भारतीय मल्ल मनीष (६७ किलो), सुनील कुमार (८७ किलो) आणि रवी (९७ किलो) कडवी लढत देण्यात अपयशी ठरले.रवीने चिनी ताइपेच्या चेंग हाओ चेनचा पराभव केला. रवीला चेक प्रजासत्ताकच्या ओमारोव्हविरुद्ध पुढच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय मल्लांची निराशाजनक कामगिरी कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 04:31 IST