लुसाने : भ्रष्टाचार आरोपाच्या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ अॅथलेटिक्स फेडरेशनचे माजी प्रमुख लामिन डियाक यांनी इंटरनॅशनल अॅथलेटिक्स फाउंडेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. डोपिंग प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी डियाक यांनी लाच स्वीकारली असल्याच्या संशयावरून फ्रान्स पोलिसांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (वृत्तसंस्था)
डियाक यांचा राजीनामा
By admin | Updated: November 11, 2015 23:13 IST