चेन्नई : सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि विराट कोहलीपाठोपाठ भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेही इंडियन सुपर लीगमध्ये (आएसएल) एन्ट्री मारली आहे. त्याने चेन्नईयन एफसी संघाची भागीदारी विकत घेतली आहे. बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन याच्यासह तो चेन्नईयन संघाचा सह मालकबनला आहे. याबाबत धोनी म्हणाला, शाळेतील फुलबॉल संघाचा मी गोलकिपर होतो आणि हा खेळ पाहताना मला खूप आनंद मिळतो. त्यामुळे मला या खेळाशी जोडून घ्यायचे होते. म्हणून मी चेन्नईयन एफसी संघाचा सहमालक होण्याचा निर्णय घेतला. चेन्नईशी पुन्हा एकदा नाते जुळल्याने आनंद झाला आहे.
आयएसएलमध्ये धोनीची एन्ट्री
By admin | Updated: October 7, 2014 03:04 IST