शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

धोनीपर्व समाप्तीकडे?

By admin | Updated: October 12, 2015 23:59 IST

विश्वविजेत्याचा चषक भारतीयांच्या स्वाधीन करणारा, भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी ‘कॅप्टन’ महेंद्रसिंह धोनीवरच आज चाहत्यांनी हल्लाबोल चढविला आहे. चारही बाजूंनी धोनीवर टीका केली जात आहे.

नवी दिल्ली : विश्वविजेत्याचा चषक भारतीयांच्या स्वाधीन करणारा, भारतीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी ‘कॅप्टन’ महेंद्रसिंह धोनीवरच आज चाहत्यांनी हल्लाबोल चढविला आहे. चारही बाजूंनी धोनीवर टीका केली जात आहे. त्यामुळे धोनीपर्व समाप्तीकडे वाटचाल करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० आणि त्यानंतर पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर त्यात आणखीच भर पडली. ज्याच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी-२०, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन ट्रॉफी भारतीयांनी मिळविली, तो सर्वांत यशस्वी कर्णधार आज पराभवाच्या गर्तेत अडकला. त्यामुळे त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार होत आहे. याच कारणामुळे गेल्या वर्षी धोनीवर आॅस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ करण्याची वेळ आली होती. मात्र, वन-डेमध्ये तो कर्णधार म्हणून आणि एक फलंदाज म्हणूनही अपयशी ठरत आहे. कानपूरच्या खेळीवर प्रश्न! सर्वाेत्कृष्ट ‘फिनिशर’ म्हणून प्रसिद्ध महेंद्रसिंह धोनी कानपूर येथे टीम इंडियाला विजयापर्यंतही नेऊ शकला नाही. आता क्रिकेट विश्लेषकांबरोबरच माजी क्रिकेटपटूंनीसुद्धा मान्य केले, की धोनी करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. कानपूर येथे धावांसाठी ज्या पद्धतीने धोनी संघर्ष करीत होता, त्यावरून हे बरेचसे जाणवले. पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या धोनीने ३० चेंडूंत ३१ धावा केल्या. यात त्याला एकही चौकार खेचता आला नाही. त्याच्या याच संथ खेळीने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाची अडचण अधिक वाढली होती. संघावर दडपण वाढले. ज्यामुळे, भारताने अवघ्या ५ धावांनी हा सामना गमावला. धोनीने रोहित शर्मासोबत ५५ धावांची भागीदारी केली; मात्र धोनी एका-एका धावेसाठी संघर्ष करीत होता.कर्णधार म्हणून धोनीची २००७ पासूनची कारकीर्द...आयसीसीच्या टी-२० वर्ल्डकप (२००७), वर्ल्डकप(२०११), चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) तीन्ही प्रारुपातील विजेतेपद जिंकली.इंडियन प्रिमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जला दोन वेळा विजेतेपद मिळवून दिले. चॅम्पियन लीगमध्ये आपल्या संघाला विजेतेपद जिंकून दिले. इतर जेतेपद२००८ कॉमन वेल्थ बँक सिरीज (आॅस्ट्रेलिया)२००९ श्रीलंका येथे कॉम्पॅक्ट चषक२०१० श्रीलंका एशिया कप२०१३ कॅरिबियन सेलकोन मोबाईल कप यासह ११ वन-डे मालिका जिंकल्या.> काय म्हणतात माजी खेळाडू..धोनीला ‘बळीचा बकरा’ बनवले जातेय - सुनील गावस्करटीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला ‘बळीचा बकरा’ बनवले जात असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त करून त्याची पाठराखण केली आहे. धोनी अजूनही भारताचा नंबर एक ‘फिनिशर’ आहे. ही गोष्ट वेगळी, की वाढत्या वयानुसार माणसाची शक्ती कमी होते. हे फक्त खेळामध्येच नव्हे, तर इतर दुसऱ्या गोष्टींमध्ये लागू होते. संघ हरतो तेव्हा कुणाला तरी बळीचा बकरा बनवले जाते.या वेळी पराभवाचे खापर धोनीवर फोडले जात आहे हे योग्य नाही, असेही गावस्कर म्हणाले.काही वर्षांपासून धोनीने देशाला गौरव मिळवून दिला. त्यामुळे एका खराब कामगिरीमुळे त्याचे योगदान विसरता कामा नये. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाला गोलंदाज कारणीभूत आहेत. - जेव्हा चेंडू धोनीच्या आजूबाजूने असायचा, तेव्हा तो त्याला उत्तमरीत्या खेळायचा. आता मात्र असे होत नाही. गोलंदाजांनाही माहीत झाले आहे, की धोनीमध्ये पहिल्यासारखी चपळता उरलेली नाही. त्याच्यात आजही क्षमता आहे; पण पहिल्यासारखा धोनी पाहायला मिळेल, असे दिसत नाही. - के. श्रीकांत > धोनीने आता इतर खेळाडूंसमोर एक उदाहरण म्हणून उभे राहण्याची गरज आहे. तर, आगरकरने धोनीच्या जागी विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचा सल्ला दिला आहे. - अझहरुद्दीन, > धोनी आजही उत्कृष्ट फिनिशर असल्याचे वाटते. मला नाही वाटत, की त्याची भूमिका बदलली आहे. नंबर चारवर खेळावा असेही वाटत नाही. तो आपल्या लयीत पुन्हा परतेल आणि लोक पुन्हा वेगळ्या पद्धतीने बोलतील. - अनिल कुंबळे