शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

धोनीचा सल्ला सकारात्मक घेणार

By admin | Updated: July 7, 2015 01:22 IST

भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बांगलादेश दौऱ्यामध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबद्दल टीका करुन सर्वांनाच चक्रावून टाकले होते.

मुंबई : भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बांगलादेश दौऱ्यामध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबद्दल टीका करुन सर्वांनाच चक्रावून टाकले होते. परंतु, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी हंगामी कर्णधार म्हणून निवड झालेल्या अजिंक्य रहाणे याने आपल्या या सिनियर खेळाडूच्या टीकेकडे एक सूचना म्हणून पाहणार असून त्यावर सकारात्मरीत्या खेळणार असल्याचे स्पष्ट केले. १० जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मंगळवारी पहाटे भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना होईल. त्यापूर्वी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार रहाणे याने संवाद साधला. धोनीने माझ्या फलंदाजीविषयी मला फीडबॅक दिला असून त्याकडे मी सकारात्मकरीत्या पाहणार आहे व त्यानुसार मी पुढे जात आहे. बांगलादेश दौरा आता माझ्यासाठी इतिहास झाला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील, असे रहाणेने सांगितले. तसेच संघामध्ये सिनियर व ज्युनियर खेळाडू असा भेद करण्यात विश्वास नसल्याचे देखील रहाणेने सांगितले. आतापर्यंत भारतासाठी १५ कसोटी, ५५ एकदिवसीय आणि ११ टी-२० सामने खेळलेला रहाणे पुढे म्हणाला की, संघात सिनियर किंवा ज्युनियर असा भेद नसून सर्व खेळाडू समान आहेत. कर्णधार म्हणून माझे स्वतंत्र विचार आहेत. शिवाय संघातील सर्व खेळाडूंना स्वत:च्या क्षमतेवर देखील विश्वास असणे गरजेचे आहे. हरभजनच्या पुनरागमनाविषयी रहाणेने सांगितले की, त्याने भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याच्या पुनरागमनामुळे मी खूप आनंदी असून जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा निश्चितच त्याच्या अनुभवाचा फायदा घेईन, असे सांगत संघ पूर्णपणे सज्ज असल्याचेही सांगितले.(क्रीडा प्रतिनिधी)> भारतीय संघअजिंक्य रहाणे (कर्णधार), हरभजन सिंग, धवल कुलकर्णी, मनिष पांड्ये, अंबाती रायडू, मनोज तिवारी, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, केदार जाधव, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, संदीप शर्मा, मोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक).> भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक १० जुलै - पहिला वन-डे सामना१२ जुलै - दुसरा वन-डे सामना१४ जुलै - तिसरा वन-डे सामना१७ जुलै - पहिला टी-२० सामना१९ जुलै - दुसरा टी-२० सामना