ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. २७ : महेंद्रसिंग धोनी याने चौथ्या स्थानावरच फलंदाजीसाठी यायला हवे. असे केल्यास तो आणि विराट कोहली फिनिशरची भूमिका वठवू शकतात, असा सल्ला माजी कर्णधार सौरव गांगुली याने दिला आहे. धोनी चौथ्या स्थानावर खेळल्यास सामना संपविणे त्याच्यासाठी सोईचे ठरेल. फिनिशरचा अर्थ त्याने ४० व्या षटकापासून फलंदाजी करावी असा नव्हे. विराटतिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येतो.
फिनिशरने तळाच्या स्थानावर खेळायला हवे, हा विचारच चुकीचा आहे. धोनीने चौथ्या स्थानावर खेळून देशाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. रांची येथे काल विराटने ४५ धावा ठोकल्या. तरीही भारत पराभूत झाला. यावर गांगुली म्हणाला, भारताने कोहलीवर अधिक विसंबून राहू नये