शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

धोनीने दिले चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: October 26, 2016 00:54 IST

बिहारचे माजी कर्णधार व देशातील सर्वोत्तम क्युरेटर दलजितसिंग यांनी मोहाली सामन्यात वन-डेसाठी चांगली खेळपट्टी तयार केली. खेळपट्टीवर चेंडू ज्या वेगाने येत होता;

- सुनील गावसकर लिहितो़...बिहारचे माजी कर्णधार व देशातील सर्वोत्तम क्युरेटर दलजितसिंग यांनी मोहाली सामन्यात वन-डेसाठी चांगली खेळपट्टी तयार केली. खेळपट्टीवर चेंडू ज्या वेगाने येत होता; त्यामुळे फलंदाजांना सहज खेळता येत होते. खेळपट्टीवर हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाज व मनगटाच्या बळावर फिरकी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना विकेट घेण्यास मदत मिळाली. त्यामुळेच लेग स्पिनर अमित मिश्राला रॉस टेलर व ल्युक रोंची यांच्यासारख्या फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवता आला.धर्मशाला व दिल्लीतील फिरोजशाह कोटलावर फलंदाजांनी आपल्या चुकीमुळे विकेट बहाल केल्या. मोहालीमध्ये टॉम लॅथम व रॉस टेलर यांच्या चांगल्या फलंदाजीनंतर जिम्मी निशाम व मॅट हेन्री यांनी नवव्या विकेटसाठी उपयुक्त भागीदारी करून येथे मोठी खेळी करणे शक्य असल्याचे सिद्ध केले. त्यांच्या चमकदार खेळीमुळे न्यूझीलंडने सन्मानजक धावसंख्या उभारली आणि गोलंदाजांना काही करण्याची संधी मिळवून दिली. पाहुण्यांनी दिल्लीमध्ये यजमान संघाला २३६ धावांत रोखले होते. जर क्षेत्ररक्षकांची साथ लाभली असती, तर मोहालीमध्येही संघाला विजय मिळविण्याची संधी होती. क्रिकेट रंगतदार खेळ आहे, याची प्रचिती स्लिपचा स्पेशालिस्ट क्षेत्ररक्षक रॉस टेलरने विराट कोहलीचा एक सोपा झेल सोडल्यानंतर आली. भारतीय उपकर्णधाराने मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेऊन कर्णधार धोनीच्या साथीने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोहलीने शतकी खेळीदरम्यान आकर्षक फटके मारले. विराटच्या शतकी खेळीनंतर टेलरसाठी केवळ सहानुभूती व्यक्त करता येईल.धोनीने मोहालीत शानदार खेळी करून आपल्या स्थानाबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले. त्यासोबत त्याने टीकाकारांनाही गप्प केले. दरम्यान, अशा बाबीचा भारतीय कर्णधारावर काही प्रभाव पडत नाही आणि अनुभवाच्या जोरावर संघाला निर्धारित लक्ष्य गाठून देण्यात यशस्वी ठरतो. सलामी जोडीचे अपयश भारतीय संघासाठी सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. आतापर्यंत या जोडीला संघाला अपेक्षित यश मिळवून देता आलेले नाही. नव्या चेंडूने पांड्याला मोहालीमध्ये छाप सोडता आली नाही, यादवने चांगला मारा केला तर केदार जाधवने बळी घेऊन धोनीच्या चाणाक्ष कर्णधारपदाची प्रचिती दिली. खेदाची बाब ही आहे, की जे दुसऱ्याकडून निर्देश घेतात आणि कर्णधारपदाबाबत काही माहिती नसते ते धोनीला कर्णधारपदावरून हटविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच म्हटले जाते, की मेरा भारत महान ! (पीएमजी)