नवी दिल्ली : सामन्यादरम्यान मैदानावर सत्कार सोहळा आयोजित केल्याने नियमांची पायमल्ली होत असल्याची सबब बीसीसीआयने दिल्यामुळे, दिल्ली सरकारने राज्यातील आजी-माजी खेळाडूंचा सत्कार करण्याचा कार्यक्रम रद्द ठरविला.फिरोजशाह कोटलवार सध्या भारत-द.आफ्रिका सामना सुरू आहे. सामन्याच्या मध्ये मैदानावर असा कार्यक्रम होऊ शकत नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. दिल्ली सरकारने डीडीसीएला १० खेळाडूंचा सत्कार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते करण्यात येईल, असे कळविले आहे. ज्या खेळाडूंचा सत्कार होणार होता त्यात बिशनसिंग बेदी, मोहिंदर अमरनाथ, मदन लाल, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचा समावेश होता. हा कार्यक्रम नियमात बसत नसल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता - मुद्गलफिरोजशाह कोटलावर सत्कार घेण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते. सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी मला वारंवार फोनही केले पण बीसीसीआयच्या निर्देशानुसार मैदानावर हा सोहळा करता येणे शक्य नव्हते, असे सामन्याचे पर्यवेक्षक सेवानिवृत्त न्या. मुकुल मुद्गल यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली सरकारला परवानगी नाकारली
By admin | Updated: December 6, 2015 01:35 IST