शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

दिल्लीचा ‘डेअरिंग’बाज विजय

By admin | Updated: May 21, 2016 04:48 IST

रोमांचक सामन्यात करुण नायरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हील्सने सनरायझर्स हैदराबादला ६ विकेट्सने नमवले.

रायपूर : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात करुण नायरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हील्सने सनरायझर्स हैदराबादला ६ विकेट्सने नमवले. या विजयासह दिल्लीने प्ले आॅफ गाठण्यासाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली.शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने क्षेत्ररक्षण स्वीकारुन हैदराबादला ७ बाद १५८ धावा असे मर्यादेत रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अडखळती झाली. क्विंटन डीकॉक स्वस्तात परतल्यानंतर रिषभ पंत व करुण नायर यांनी ७३ धावांची भागीदारी करुन दिल्लीला सावरले. भुवनेश्वरने पंतला धावबाद करुन ही जोडी फोडली. पंतने २६ चेंडूत ३२ धावा केल्या. नायरने जेपी ड्युमिनीसह संघाला विजयी मार्गावर आणले. दरम्यान, यावेळी गचाळ क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका हैदराबाद बसला. नायर व ड्युमिनी यांचे सोपे झेल यावेळी सुटल्याने दिल्लीने याचा फायदा घेत विजय मिळवला. या दोघांनी ३५ धावांची भागीदारी केली. ड्युमिनी (१७) बाद झाल्यानंतर कार्लोस ब्रेथवेटही (१०) लगेच परतला. परंतु, जम बसलेल्या नायरने ५९ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा फटाकवत संघाला विजयी केले. बरिंदर सरणने २ बळी घेत दिल्लीला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी डेव्हीड वॉर्नरच्या ७३ धावांच्या कॅप्टन्स इनिंग्जच्या जोरावर हैदराबादने समाधानकार मजल मारली. ब्रेथवेटने दोन महत्त्वपूर्ण बळी घेत हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक मारला. वॉर्नरने ५६ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह आपली खेळी सजवली. अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादला दिडशेचा टप्पा पार करण्याचे समाधान लाभले. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलकसनरायझर्स हैदराबाद : २० षटकात७ बाद १५८ धावा (वॉर्नर ७३, हेन्रीकेज १८; ब्रेथवेट २/२७) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हील्स : २० षटकात ४ बाद १६१ धावा (करुण नायर नाबाद ८३, रिषभ पंत ३२; बरिंदर सरण २/३४)