शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

‘कोटला’वर दिल्लीची बाजी

By admin | Updated: April 16, 2017 03:48 IST

फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सने बाजी मारली. सलामीवीर सॅम बिलिंग (५५) आणि कोरी

नवी दिल्ली : फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सने बाजी मारली. सलामीवीर सॅम बिलिंग (५५) आणि कोरी अँडरसन (नाबाद ३९) यांच्या धडाकेबाज फलंदाजीनंतर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने पंजाबचा ५१ धावांनी पराभव केला. दिल्ली डेअरडेव्हिल्सने २० षटकांत ६ बाद १८८ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ १३७ धावांवर तंबूत परतला. कोरी अँडरसन सामनावीर ठरला.प्रत्युत्तरात, पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. संथ सुरुवातीनंतर सलामीवर मनन वोहरा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. वृद्धिमन साहा (७) बाद झाल्यानंतर हाशीम आमला आणि मॉर्गन यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॉरीसने आमलाला मोक्याच्या क्षणी बाद करीत धक्का दिला. कर्णधार मॅक्सवेल शून्यावर आणि मिलर २४ धावा काढून तंबूत परतले. त्यामुळे पंजाब १३.४ षटकांत ६ बाद ८८ अशा स्थितीत होता. अक्षर पटेलने फटकेबाजी केली. त्याने सर्वाधिक ४४ धावा केल्या. इतर फलंदाज अपयशी ठरल्याने त्याची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. दिल्लीकडून मॉरीसने सर्वाधिक ३, नदीम आणि कमिन्स यांनी प्रत्येकी २बळी घेतले. त्याआधी, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सलामीवीर संजू सॅमसन आणि सॅम बिलिंग यांनी योग्य ठरवत संघाला अर्धशतकी सलामी दिली. पंजाबचा फिरकी गोलंदाज करियप्पा याला षटकार ठोकत सॅमसनने आपला आक्रमक इरादा स्पष्ट केला; परंतु पुढच्याच चेंडूवर करियप्पाने त्याला बाद करून दिल्लीची सलामी जोडी फोडली. सॅमसनने १९ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावरील करूण नायरला भोपळाही फोडता आला नाही. वरूण अ‍ॅरोनने त्याला बाद केले.श्रेयस अय्यर (२२) आणि रिषभ पंत (१५) यांनी फटकेबाजीचा सिलसिला पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यांना अनुक्रमे मोहित शर्मा आणि वरूण अ‍ॅरोन यांनी बाद केले. जम बसलेल्या अर्धशतकवीर बिलिंगला अक्षर पटेलने बाद केले. शेवटच्या षटकांत फटकेबाजी करत कोरी अ‍ॅँडरसनने (नाबाद ३९) दिल्लीला मोठी धावसंख्या गाठून दिली.संक्षिप्त धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स २० षटकांत ६ बाद १८८. (बिलिंग ५५, अय्यर २२, अ‍ॅँडरसन नाबाद ३९, मॉरीस १६. गोलंदाजी- अ‍ॅरोन ४५/२, संदीप शर्मा, मोहित शर्मा, अक्षर पटेल आणि करीअप्पा प्रत्येकी एक बळी. वि. वि. किंंग्स इलेव्हन पंजाब २० षटकांत ९ बाद १३७ धावा. (मॉर्गन २२, मिलर २४, अक्षर पटेल ४४, गोलंदाजी - मॉरीस २३/३, नदीम १३/२. कमिन्स २३/२, मिश्रा आणि अ‍ॅँडरसन प्रत्येकी एक बळी.)