शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या दीपिका कुमारीला रौप्यपदक; 18 वर्षांच्या कोरियन खेळाडूकडून हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 16:25 IST

भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीनं टोक्यो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली.

नवी दिल्ली : भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीनं टोक्यो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत तिला 18 वर्षीय कोरियाच्या अॅन सॅनकडून पराभव पत्करावा लागला. पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या दीपिकाला दुसऱ्या मानांकित सॅनकडून कडवी टक्कर मिळाली. 

बर्लिन येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात दोन सुवर्णपदक जिंकणाऱ्या सॅनने पहिला सेट एका गुणाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सॅनने 29-25 असा विजय मिळवला. तिसऱ्या सेटमध्येही सॅनचे वर्चस्व राहिले.''मी सातत्यपूर्ण कामगिरी केली, परंतु अंतिम फेरीत सॅनच्या कामगिरीला तोडीस तोड कामगिरी करण्यात अपयशी ठरलो. मी माझ्या खेळात काही तांत्रिक बदल केला आहे. त्यामुळे आणखी मला त्याची सवय झालेली नाही,'' असे दीपिकानं सांगितलं.  

 

दीपिकाला पुढील वर्षी टोक्योत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित करता आलेली नाही, परंतु या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करत ऑलिम्पिक पात्रतेचं तिचं लक्ष्य आहे. ती म्हणाली,''सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास आम्ही ऑलिम्पिक तिकीट मिळवू, अशी अपेक्षा आहे.'' 

टॅग्स :Deepika Kumariदीपिका कुमारी