शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दीपाने घडविला इतिहास

By admin | Updated: April 19, 2016 03:39 IST

दीपा करमाकरने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होण्याचा मान मिळवला.

रिओ जानेरिओ : दीपा करमाकरने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होण्याचा मान मिळवला. दीपाने येथे अखेरच्या पात्रता व चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवले. २२ वर्षीय दीपाने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई करीत आॅगस्टमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये कलात्मक (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टिकसाठी स्थान निश्चित केले. आॅलिम्पिकसाठी ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिम्नॅस्टिकमध्ये पात्रता गाठणारी दीपा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ११ भारतीय पुरुष जिम्नॅस्टिकपटूंनी आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन आणि १९६४ मध्ये सहा खेळाडू सहभागी झाले होते. दीपा आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघातर्फे अधिकृतपणे जाहीर झालेल्या यादीमध्ये दीपाने रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली असल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक महासंघाने स्पष्ट केले, की रिओमध्ये जिम्नॅस्टिक चाचणी स्पर्धेत महिला पात्रता स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाने (एफआयजी) रिओ २०१६ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या देशांची व वैयक्तिक खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.दीपाला रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या महिला कलात्मक जिम्नॅस्ट क्रीडा प्रकारात वैयक्तिक पात्रता यादीतील ७९ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. चाचणी स्पर्धेतील सर्वांत खडतर असलेल्या वॉल्ट राउंडमध्ये दीपाने १५.०६६ गुणांची कमाई केली. सहभागी झालेल्या १४ स्पर्धकांमध्ये ही सर्वाधिक गुणसंख्या होती, पण अनइव्हन बारमध्ये तिची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यात तिला केवळ ११.७०० गुणांची कमाई करता आली. सहभागी स्पर्धकांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्यांत ती दुसऱ्या स्थानावर होती. त्रिपुराच्या या जिम्नॅस्टने बीम व फ्लोअर एक्सरसाईजमध्ये अनुक्रमे १३.३६६ व १२.५६६ गुण मिळवले. आंतरराष्ट्रीय रेफ्री दीपक कागरा म्हणाले, ‘‘दीपाच्या चमकदार कामगिरीनंतर ती रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणार असल्याचे निश्चित झाले होते. दीपाच्या कामगिरीचा जिम्नॅस्टिक वर्तुळाला अभिमान आहे.’’ (वृत्तसंस्था)> तळवे सपाट, तरी देशातील सर्वोत्तम जिम्नॅस्टनवी दिल्ली : ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतातर्फे आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली महिला जिम्नॅस्ट ठरलेली दीपा करमाकर एक वेळ सपाट तळवे असल्यामुळे या क्रीडाप्रकारात सहभागी होण्यास असमर्थ होती. ९ आॅगस्ट १९९३ रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे जन्मलेल्या दीपाने वयाच्या सहाव्या वर्षापासून जिम्नॅस्टिकची कास धरली. त्या वेळी दीपाच्या पायाचे तळवे सपाट होते. जिम्नॅस्टिकमध्ये अशा प्रकारच्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; पण अनुभवी प्रशिक्षक बिस्बेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सचा सराव करणाऱ्या दीपाने या अडचणीतून मार्ग काढला. दीपाचे प्रशिक्षक नंदी म्हणाले, ‘‘दीपा ज्या वेळी माझ्याकडे आली, त्या वेळी तिचे तळवे सपाट होते. जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारासाठी ही अडचणीची बाब आहे. अशा पायामुळे अ‍ॅथलिटला आपले संतुलन राखणे, धावणे किंवा उडी मारणे अडचणीचे ठरते. दीपासाठी यातून मार्ग काढण्याचे सर्वांत मोठे आव्हान होते. दीपाच्या पायामध्ये त्या वेळी सुधारणा करणे सोपे नव्हते; पण आम्ही तिच्या बालपणापासून त्यावर मेहनत घेतली.’’> दीपाची कामगिरी युवा पिढीला प्रेरित करणारी : तेंडुलकरनवी दिल्ली : आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरल्यानंतर दीपा करमाकरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अन्य व्यक्तींनी तिची या ऐतिहासिक कामगिरीसाठी प्रशंसा केली आहे. तेंडुलकरने टिष्ट्वट केले, की ‘दीपा ऐतिहासिक कामगिरीसाठी तुझे अभिनंदन! तुझी कामगिरी युवा पिढीला प्रेरित करणारी आहे.’सोनोवाल यांनी दीपाचे अभिनंदन करताना म्हटले, की ‘भारतीय जिम्नॅस्टिक्सला नवी उंची गाठून देण्यासाठी अभिनंदन! दीपा तुझ्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.’> दीपाने जिंकले सुवर्णपदकरियो दी जानेरियो : आॅलिम्पिक स्पर्धेचे आपले तिकीट पक्के केल्यानंतर भारताच्या दीपा करमाकरने आॅलिम्पिक व्हेन्यू टेस्ट इव्हेन्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २२ वर्षीय दीपाने वॉल्ट्स प्रकारात १४.८३३ गुण संपादन करून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.