शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

द.आफ्रिका उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: March 13, 2015 00:56 IST

कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर द. आफ्रिकेने संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा गुरुवारी १४६ धावांनी पराभव करून विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

वेलिंग्टन : कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर द. आफ्रिकेने संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा गुरुवारी १४६ धावांनी पराभव करून विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.संघासाठी आपण किती महत्त्वपूर्ण खेळाडू आहोत, हे डिव्हिलियर्सने आज पुन्हा सिद्ध केले. त्याने ९९ धावा ठोकल्या; शिवाय दोन गडीही बाद केले. त्याच्याशिवाय बेहारडिनने अखेरच्या क्षणी ३१ चेंडू टोलवून नाबाद ६४ धावा फटकावताच मंदगतीने सुरुवात करणाऱ्या द. आफ्रिकेने ६ बाद ३४१ धावा उभारल्या. स्पर्धेत सर्वच सामने गमावणाऱ्या यूएईने विजयी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्नही केला नाही. ४७.३ षटकांत १९५ धावांत त्यांचा डाव आटोपला. स्वप्निल पाटील याने सर्वाधिक नाबाद ५७ धावा केल्या; पण त्यासाठी तो शंभर चेंडू खेळला. भारत आणि पाककडून पराभूत झालेल्या आफ्रिकेने यूएईवर चमकदार विजयासह ६ सामन्यांत ८ गुणांची कमाई करून भारतापाठोपाठ दुसऱ्या स्थानासह साखळीची सांगता केली. यूएईचा हा सलग पाचवा पराभव होता. रविवारी त्यांची गाठ पडेल ती विंडीजशी.डिव्हिलियर्सचे शतक एका धावेने हुकल्यानंतरही तो हसत-हसत पॅव्हेलियनमध्ये परतला. ८३ चेंडूंच्या त्याच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. अर्थात, सामन्याचा मानकरी तोच ठरला. सातव्या स्थानावर आलेल्या बेहारडिनने ५ चौकार आणि ३ षटकारांचा झंझावात केला. यूएईने बचावात्मक पवित्रा घेतल्याने त्यांना विजयासाठी प्रयत्न करताच आले नाहीत. १३व्या षटकापर्यंत ४५ धावांत ३ गडी गमावणाऱ्या या संघाने स्वप्निल पाटीलच्या बळावर काहीसा प्रतिकार केला खरा; पण तीदेखील औपचारिकताच ठरली. अन्वरने ३९ आणि नावीदने १७ धावा केल्या. डिव्हिलियर्सने १५ धावांत त्यांचे २ गडी टिपले. फिलांडरनेदेखील २ गडी बाद केले. त्याआधी हाशिम आमला १२ आणि डिकॉक २६ यांनी अडखळत सुरुवात केली; पण रोसो (४३) आणि डिव्हिलियर्स यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. मिलरने (४९) डिव्हिलियर्ससोबत चौथ्या गड्यासाठी १०८ धावांची भागीदारी केली. ड्युमिनीने २३ धावा केल्या, तर फिलांडर १० धावा काढून नाबाद राहिला. (वृत्तसंस्था)