शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

VIDEO: बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने घेतला पराभवाचा बदला; मॅग्नस कार्लसनने असा व्यक्त केला राग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:36 IST

भारताच्या विश्वविजेत्या गुकेशने जागतिक नंबर-१ मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे.

Norway Chess: नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव करून विश्वविजेता डी गुकेशने अखेर त्याचा बदला घेतला. नॉर्वे बुद्धिबळ २०२५ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत डोमराजू गुकेशने मॅग्नस कार्लसनवर आश्चर्यकारक विजय मिळवला. डी गुकेशचा मॅग्नस कार्लसनविरुद्धचा विजय ऐतिहासिक होता कारण त्याने पराभवाच्या छायेत असतानाच हा विजय खेचून आणला. या विजयानंतर मात्र कार्लसने पराभवाचा राग व्यक्त केला ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. गुकेशकडून पराभूत झाल्यानंतर कार्लसने जोरात चेस टेबलवर आपला हात आदळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन वर्षांत दुसऱ्यांदा, एका भारतीयाने नॉर्वे बुद्धिबळात मॅग्नस कार्लसनला हरवून पहिला विजय नोंदवला आहे. आठवड्यापूर्वीच मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळाच्या पहिल्या फेरीत विश्वविजेता डी गुकेशला हार मानण्यास भाग पाडले होते. त्यानंतर गुकेशने सोशल मीडियावर एक पोस्ट करत, जेव्हा तुम्ही राजाच्या जवळ जाता तेव्हा अजिबात चुकू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा स्टॅव्हॅन्गर येथे गुकेशने नेमके हेच केले. १९ वर्षीय डी गुकेशने जगातील नंबर १ वर विजय मिळवण्यासाठी ६२ चाली खेळल्या आणि त्याला पराभूत केले. या सामन्यात गुकेशकडून पराभव झाल्यानंतर मॅग्नस कार्लसनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याच वेळी, गुकेश खूप शांत दिसत होता.

कार्लसनने सामन्यात गुकेशवर वर्चस्व गाजवले होते, परंतु शेवटी गुकेशने चाल खेळून त्याला पराभूत केले. त्यामुळे कार्लसन निराश झाला आणि त्याने जोरात आपला हात चेस टेबलवर आदळला. त्यानंतर उभं राहून त्याने गुकेश सोबत आता मिळवला. मात्र यावेळी गुकेश तोंडावर हात ठेवून आश्चर्यचकित होऊन हे पाहत होता.

या विजयासह, डी गुकेश नॉर्वे बुद्धिबळ २०२५ च्या गुणतालिकेत ८.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आणि आता तो कार्लसन आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनापेक्षा फक्त एक गुण मागे आहे. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ