शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Shiva Thapa, CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत रंगला India vs Pakistan सामना; बॉक्सर शिवा थापाने पाकिस्तानी खेळाडूला धु धु धुतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:58 IST

Commonwealth Games 2022, Shiva Thapa : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) असा सामना पाहायला मिळाला.

Commonwealth Games 2022, Shiva Thapa : राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) असा सामना पाहायला मिळाला. भारताचा बॉक्सर शिवा थापा ( Shiva Thapa) याने ६३.५ किलो गटातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा ५-० असा पराभव केला. शिवाने पाकिस्तानी बॉक्सरला डोकं वर काढण्याची एकही संधी दिली नाही आणि त्या धु धु धुवत सहज बाजी मारली. पुढील सामन्यात त्याच्यासमोर २०२१च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या रिसे लींच ( स्कॉटलंड) याचे आव्हान आहे.  

Harmanpreet Kaur, CWG 2022, INDW vs AUSW : भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास घडविला, ऑस्ट्रेलियाला चांगलाच धडा शिकवला

२८ वर्षीय शिवाच्या नावावर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील १ सुवर्ण ( २०१३), दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदकं आहेत. त्याने सुरेख पंच मारताना पाकिस्तानी बॉक्सरला हतबल केले.  त्याने २०१५च्या जागतिक स्पर्देत कांस्यपदकाची कमाई केली आहे.

  • टेबल टेनिस महिला सांघिक गट - भारताचा मनिका बात्राचा ११-५, ११-३, ११-२ असा दक्षिण आफ्रिकेच्या मुश्फीक कलामवर विजय  
  • Lawn Bowls मध्ये भारताच्या तानिया चौधरीला १०-२१ अशा फरकाने स्कॉटलंडच्या डी हॉगनकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष गटातही भारताला न्यूझीलंडकडून ६-२३ अशी हार मानावी लागली.  
  • Cycling Men's Team Pursuit गटात भारताने ४००० मीटर पात्रता स्पर्धेत ४:१२.८६५ सेकंदाची वेळ नोंदवली     
  • टेबल टेनिस महिला सांघिक गटात भारताची दणक्यात सुरूवात झाली. त्यांनी ३-० अशा फरकाने दक्षिण आफ्रिकेवर मात केली. 
  • Swimming Men's 100m Backstroke Heats: भारताच्या श्रीहरी नटराजने पात्रता फेरीत ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून पाचव्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाboxingबॉक्सिंगIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान