शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

क्रिकेटचा बोलपट थंडावला

By admin | Updated: September 17, 2015 23:57 IST

दूरदर्शनची चैन सामांन्यांच्या आवाक्यात नव्हती अशा काळात आपल्या वाणीतून आकाशवाणीवरुन क्रिकेट सामना जिवंत करणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू व समालोचक बाळ. ज. पंडित (वय ८६) यांचे गुरुवारी

पुणे : दूरदर्शनची चैन सामांन्यांच्या आवाक्यात नव्हती अशा काळात आपल्या वाणीतून आकाशवाणीवरुन क्रिकेट सामना जिवंत करणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू व समालोचक बाळ. ज. पंडित (वय ८६) यांचे गुरुवारी दुपारी साडेचारवाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मालती, मुलगा अवधुत व सिद्धराज, अंजली लिमये, सुवर्णा शिरोळकर या मुली, नातवंडे, जावई असा परिवार आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते आजारी होते. तसेच गेल्या महिनाभरापासून एका खासगी रूग्णलायत त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथेच त्यांचे निधन झाले. पंडित यांचा जन्म २४ जुलै १९२९ रोजी पुण्यात झाला. प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी फलंदाज म्हणूनही भूमिका बजावली होती. त्यांची खेळाडू म्हणून कारकिर्द १९५९-६० अशी लहानच होती. मात्र रेडिओच्या जमान्यात जनसामान्यांना खेळाचा आस्वाद घेता या वा या साठी त्यांनी समालोचकाच्या मिळालेल्या संधीचे सोने केले. याच खेळपट्टीवर शब्दांचे षटकार व चौकार ठोकत त्यांनी क्रिकेट शौकीनांना खेळाचा मनमुराद आनंद देऊ केला. वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. घरात खेळण्यातील बॅट बॉलने सुरु झालेल्या क्रिकेटने त्यांना पुढे रणजी चषक सामन्यापर्यंत नेले. त्यासाठी मामा, चुलत भाऊ, वडील जगन्नाथ पंडित यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना रामभाऊ लेले यांसारखे क्रीडाप्रेमी शिक्षक लाभले. या शिक्षकाकडूनच त्यांना क्रिकेटच्या तंत्राबरोबरच जीवनाचे तंत्रही त्यांनी शिकविल्याची भावना पंडित नेहमीच व्यक्त करीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत. लेले यांनी राजा केतकर, वसंत हसबनीस, मधु गुप्ते, माधव बर्वे अशा खेळाडूंनाही घडविलेले होते. खेळ उत्तम चालू असताना पुढे विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीस सुरुवात केली. लहानपणापासूनच मराठी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारे प्रेम यांमुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयीचे लेखन सुरु केले. त्यानंतर त्यावेळी मराठी समालोचनाविषयी चर्चा सुरु होती. तत्कालिन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुळपुळेंनी त्यांचे नाव आकाशवाणीत सुचविले होते. त्यातूनच क्रिकेटचा पहिला मराठी समालोचक होण्याचा मान त्यांना मिळाला. शब्दांचा अचूक वापर, हजरजबाबीपणा या गोष्टींची एका समालोचकाला गरज असते, याची त्यांना उत्तम जाण त्यांना होती. ते आव्हान त्यांनी लीलया पेलले. त्यांनी १९५९ साली १९, २०, २१ नोव्हेंबर या दिवशी आताचे नेहरु स्टेडीयम म्हणजेच तेव्हाचे 'क्लब आॅफ महाराष्ट्र मैदान' येथे आकाशवाणीच्या मराठीत समालोचनास सुरुवात केली होती. क्रिकेट महर्षी दि.ब.देवधर आणि महाराष्ट्र हेरॉल्डचे तत्कालिन संपादक नीळकंठ जाधव यासारख्या दिग्गजांच्या साक्षीने त्यांनी समालोचन कारकिर्दीस सुरुवात केली होती. तेव्हापासूनच मराठी समालोचन कारकिर्दीस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्या वेळी सर्व गोष्टी मराठीत येण्याची लाट असल्याने हे समालोचन लोकांच्या पचनी पडत होते. यासाठी प्राचार्य नगरवाला, विजय मर्चंट यांच्याकडून त्यांना उत्तेजन मिळाले. आज टीव्ही, मोबाईलच्या माध्यमातूनही क्रिकेट सामन्यांचा आनंद घेणे सहज शक्य झालेले आहे. मात्र रेडिओच्या जमान्यात क्रिकेटचा निर्भेळ आनंद देण्यासाठी व सामन्याचे दृश्य शौकिनांसमोर उभे करण्यासाठी शब्द व कौशल्याचा कस लागे. पंडित यांनी आपली शाब्दीक आयुधे वापरीत क्रिकेट सामने अक्षरश: जिवंत केले. क्रिकेटचा बोलपट थंडावला पुणे : दूरदर्शनची चैन सामांन्यांच्या आवाक्यात नव्हती अशा काळात आपल्या वाणीतून आकाशवाणीवरुन क्रिकेट सामना जिवंत करणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू व समालोचक बाळ. ज. पंडित (वय ८६) यांचे गुरुवारी दुपारी साडेचारवाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी मालती, मुलगा अवधुत व सिद्धराज, अंजली लिमये, सुवर्णा शिरोळकर या मुली, नातवंडे, जावई असा परिवार आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते आजारी होते. तसेच गेल्या महिनाभरापासून एका खासगी रूग्णलायत त्यांच्यावर उपचार सुरु होते. तेथेच त्यांचे निधन झाले. पंडित यांचा जन्म २४ जुलै १९२९ रोजी पुण्यात झाला. प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी फलंदाज म्हणूनही भूमिका बजावली होती. त्यांची खेळाडू म्हणून कारकिर्द १९५९-६० अशी लहानच होती. मात्र रेडिओच्या जमान्यात जनसामान्यांना खेळाचा आस्वाद घेता या वा या साठी त्यांनी समालोचकाच्या मिळालेल्या संधीचे सोने केले. याच खेळपट्टीवर शब्दांचे षटकार व चौकार ठोकत त्यांनी क्रिकेट शौकीनांना खेळाचा मनमुराद आनंद देऊ केला. वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. घरात खेळण्यातील बॅट बॉलने सुरु झालेल्या क्रिकेटने त्यांना पुढे रणजी चषक सामन्यापर्यंत नेले. त्यासाठी मामा, चुलत भाऊ, वडील जगन्नाथ पंडित यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना रामभाऊ लेले यांसारखे क्रीडाप्रेमी शिक्षक लाभले. या शिक्षकाकडूनच त्यांना क्रिकेटच्या तंत्राबरोबरच जीवनाचे तंत्रही त्यांनी शिकविल्याची भावना पंडित नेहमीच व्यक्त करीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत. लेले यांनी राजा केतकर, वसंत हसबनीस, मधु गुप्ते, माधव बर्वे अशा खेळाडूंनाही घडविलेले होते. खेळ उत्तम चालू असताना पुढे विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीस सुरुवात केली. लहानपणापासूनच मराठी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारे प्रेम यांमुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयीचे लेखन सुरु केले. त्यानंतर त्यावेळी मराठी समालोचनाविषयी चर्चा सुरु होती. तत्कालिन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुळपुळेंनी त्यांचे नाव आकाशवाणीत सुचविले होते. त्यातूनच क्रिकेटचा पहिला मराठी समालोचक होण्याचा मान त्यांना मिळाला. शब्दांचा अचूक वापर, हजरजबाबीपणा या गोष्टींची एका समालोचकाला गरज असते, याची त्यांना उत्तम जाण त्यांना होती. ते आव्हान त्यांनी लीलया पेलले. त्यांनी १९५९ साली १९, २०, २१ नोव्हेंबर या दिवशी आताचे नेहरु स्टेडीयम म्हणजेच तेव्हाचे 'क्लब आॅफ महाराष्ट्र मैदान' येथे आकाशवाणीच्या मराठीत समालोचनास सुरुवात केली होती. क्रिकेट महर्षी दि.ब.देवधर आणि महाराष्ट्र हेरॉल्डचे तत्कालिन संपादक नीळकंठ जाधव यासारख्या दिग्गजांच्या साक्षीने त्यांनी समालोचन कारकिर्दीस सुरुवात केली होती. तेव्हापासूनच मराठी समालोचन कारकिर्दीस खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्या वेळी सर्व गोष्टी मराठीत येण्याची लाट असल्याने हे समालोचन लोकांच्या पचनी पडत होते. यासाठी प्राचार्य नगरवाला, विजय मर्चंट यांच्याकडून त्यांना उत्तेजन मिळाले. आज टीव्ही, मोबाईलच्या माध्यमातूनही क्रिकेट सामन्यांचा आनंद घेणे सहज शक्य झालेले आहे. मात्र रेडिओच्या जमान्यात क्रिकेटचा निर्भेळ आनंद देण्यासाठी व सामन्याचे दृश्य शौकिनांसमोर उभे करण्यासाठी शब्द व कौशल्याचा कस लागे. पंडित यांनी आपली शाब्दीक आयुधे वापरीत क्रिकेट सामने अक्षरश: जिवंत केले. ेसमालोचनाचेरे कॉ र्ड १९५९ ते २००१ अशी तब्बल ४२ वर्षे बाळ ज. पंडित यांनी आपल्या रसाळवाणीने क्रिकेटशौकीनांना क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आनंद दिला. रणजी, दुलीप आणि इराणी करंडक स्पर्धेच्या असंख्य सामन्याचेही समालोचन करून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. मैदानावर २० आणि मैदानाबाहेर ५० वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. त्यांनी शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन देखील केले. त्यांच्या कामाची दखल लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली होती. समालोचनाबरोबर त्यांनी विविध वृत्तपत्रीय स्तंभ व पुस्तकातून क्रिकेटवर विपुल लेखन केले. १९६० पासून जवळपास तीसहून अधिक पुस्तके, मासिके, रसरंग, क्रीडा विश्व अशा विविध दिवाळी अंकातून लेखन केले. पराक्रमी दौरा', दि लिटल मास्टर, या त्यांच्या दोन पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कार, तर असे सामने, असे खेळाडू या पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला होता. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सहवासाविषयी त्यांचे आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग' हे पुस्तक देखील गाजले होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना ७८-७९ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रिकेट व्यतिरिक्त लोकमान्यांचा मानसपुत्र' हे पुस्तकही त्यांनी लिहिले. असे झाले शब्दांचे भाषांतर समालोचन मराठीत असल्याने त्यावेळी इंग्रजी शब्दांचा वापर टाळणे आणि शुद्ध मराठी भाषेत समालोचन करणे महत्त्वाचे होते. क्लीन बोल्ड, एलबीडब्ल्यू यांसारखे शब्द लोकांना मराठीतही अंगवळणी पडले होते. मात्र मराठीत हे सांगायचे कसे? हा मुख्य प्रश्न होता. हा प्रश्न पंडितांनी सोडावला. आज क्लीन बोल्डला त्रिफळाचीत, एलबीडब्ल्यूला पायचित असे शब्द त्यांनी त्यावेळी दिले. आता हेच शब्द रुढ झाले आहेत. एमसीएसह विविध संस्थांची सांभाळली धुरामहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष व सचिवपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. त्यांचे वडील जगन्नाथ १९४५ ते १९६५ दरम्यान आळंदी देवस्थानचे देखील विश्वस्त होते. त्यानंतर याच संस्थेचे १९६६ ते १९९९ या कालावधीत ते विश्वस्त होते. या शिवाय शिक्षणप्रसारक मंडळीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. पट्टीचा मराठी समालोचक हरपलाबाळ पंडीत गेले. अरेरे, धक्कादायक वृत्त (शॉकींग न्यूज). आज हा पट्टीचा मराठी क्रिकेट समालोचक हरपला ही कधीही भरून न निघणारी हानी होय. महाराष्ट्राच्या घराघरात क्रिकेटबद्दल गोडी निर्माण करण्यात त्यांच्या सफाईदार समालोचनाचा सिंहाचा वाटा आहे. मी १०-११ वर्षांचा असताना विठ्ठल कोचिंगमध्ये क्रिकेट शिकायला गेलो होतो. तेव्हा बाळ पंडीतच आमचे प्रशिक्षक होते. सरावानंतर अंडरआर्म झेलला ते आमच्याकडून सराव करून घ्यायचे. त्यावेळी चेंडू फेकताना त्यांच्या हाताच्या बोटातून ‘चक’ असा आवाज यायचा. हा आवाज तेव्हा पुण्यात फार फेमस होता. त्यांच्या निवडसमितीनेच मला रणजी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला एक वेगळाच आदर आहे. मी आठ महिन्यांपूर्वी त्यांना अखेरचा भेटलो होतो. त्यावेळीही त्यांच्या चेहऱ्यावरील तेज तारूण्यांतीलच होते. क्रिकेटवर जीव ओवाळून टाकणारा...आयुष्यभर क्रिकेट जगलेला... समालोचनाच्या रुपाने क्रिकेट सामन्याची रंगत वाढविणारा...सच्चा क्रिकेटप्रेमी अर्थातच बाळ पंडीत आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच इश्वर चरणी प्रार्थना.- सुरेंद्र भावे, माजी कर्णधार, महाराष्ट्र क्रिकेट संघ