शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

देशी व विदेशी शेरास सव्वा शेर

By admin | Updated: April 29, 2015 01:36 IST

सर्वाधिक धावा फटकावण्यासह सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये भारतीय व विदेशी खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत असल्याचे चित्र आहे.

नवी दिल्ली : आयपीएलच्या आठव्या पर्वातील जवळजवळ अर्धा टप्पा आटोपला असून, सर्वाधिक धावा फटकावण्यासह सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये भारतीय व विदेशी खेळाडूंमध्ये बरोबरीची लढत असल्याचे चित्र आहे.राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने सात सामन्यांत ३२३ धावा फटकावित आॅरेंज कॅप मिळवली आहे; तर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहिरने सात सामन्यांत १३ बळी घेत पर्पल कॅपचा मान मिळवला आहे. चेन्नईचा कॅरेबियन खेळाडू ड्वेन स्मिथ (२२८) पाचव्या, दिल्ली डेअरडेव्हिल्सचा श्रेयस अय्यर (२२७) सहाव्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विराट कोहली (२२०) सातव्या, दिल्ली डेअरडेव्हिल्सचा जेपी ड्युमिनी (२२०) आठव्या, बेंगळुरूचा ख्रिस गेल (२०९) नवव्या तर मुंबई इंडियन्सचा किरोन पोलार्ड (२०२) दहाव्या स्थानी आहे. स्पर्धेत आतापर्यंत १३ बळी घेणाऱ्या इम्रान ताहिरला चेन्नईच्या आशिष नेहराचे (१२ बळी) आव्हान आहे. बेंगळुरूचा युजवेंद्र चहल, मुंबईचा लसित मलिंगा व पंजाबचा अनुरित सिंग यांच्या नावावर प्रत्येकी १० बळींची नोंद आहे. कोलकाताचा मोर्न मोर्कल, पंजाबचा संदीप शर्मा, हैदराबादचा भुवनेश्वर कुमार व पंजाबचा अक्षर पटेल यांच्या खात्यावर प्रत्येकी ९ बळींची नोंद आहे. आयपीएलच्या आठव्या पर्वात २७ सामने खेळले गेले असून, केवळ एका शतकाची नोंद झाली आहे. शतकी खेळी चेन्नई संघाच्या मॅक्युलमच्या नावावर आहे. मॅक्युलमने ११ एप्रिल रोजी चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती. मुंबईचा रोहित शर्मा (नाबाद ९८), बेंगळुरूचा ख्रिस गेल (९६) व हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर (९१) यांना शतकी खेळी साकारण्याची संधी होती. एका सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीची चर्चा करताना नेहरा, ड्युमिनी, मलिंगा, संदीप शर्मा, ताहिर व डेव्हिड वीसे यांनी प्रत्येकी चार बळी घेतले आहेत. नेहराने १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले असून, सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीमध्ये तो आघाडीवर आहे. स्पर्धेत अद्याप एकाही गोलंदाजाला एका सामन्यात पाच बळी घेण्याची कामगिरी करता आलेली नाही. चौकार-षटकारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये मॅक्युलम व श्रेयस अय्यर यांनी यंदाच्या पर्वात प्रत्येकी १४ षटकार ठोकले आहेत. गेल, पोलार्ड व वॉर्नर यांनी प्रत्येकी १३ तर स्मिथ व रोहित यांनी प्रत्येकी १२ षटकार फटकावले आहेत. (वृत्तसंस्था)सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर रहाणेला टक्कर देऊन दुसऱ्या स्थानी आहे. वॉर्नरने ४५.२८च्या सरासरीने ३१७ धावा फटकावल्या आहेत. आठव्या पर्वात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या खेळाडूंमध्ये रहाणे ५३.८३च्या सरासरीने ३२३ धावा फटकावित सर्वांत आघाडीवर आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (२४४) तिसऱ्या तर चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू ब्रेंडन मॅक्युलम (२३२) चौथ्या स्थानी आहे.