शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: २०२१ मध्येही टोकियो ऑलिम्पिकची शक्यता कमीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 23:41 IST

कोबे विद्यापीठातील साथीच्या रोगाचे तज्ज्ञ प्रा. केटारो इव्हाटा यांनी, प्रामाणिकपणे सांगायचे तर टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षी होईलच, याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले.

टोकियो : कोरोना व्हाायरसमुळे वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन २०२१ मध्ये होण्याची शक्यता कमीच आहे.कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे अवघड होत अवघड होत असल्यामुळे एका तज्ज्ञाने सोमवारी ही भीती व्यक्त केली. कोबे विद्यापीठातील साथीच्या रोगाचे तज्ज्ञ प्रा. केटारो इव्हाटा यांनी, प्रामाणिकपणे सांगायचे तर टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन पुढील वर्षी होईलच, याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले. जपान आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळाडू तसेच क्रीडा महासंघांच्या दडपणानंतर मागच्या महिन्यात टोकियो २०२० आॅलिम्पिकचे आयोजन २३ जुलै २०२१ पर्यंत पुढे ढकलले होते. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान माजवले असून अद्यापही हजारो लोकांचे जीव जात आहेत. लाखो लोकांना या व्हायरसने ग्रासले असून त्यावर नियंत्रण मिळविणारे औषध किंवा लसदेखील उपलब्ध नाही. अशावेळी कोरोनावर मात करायची कशी, अशी समस्या निर्माण झाली. पुढारलेल्या देशातील नागरिक हजारोंच्या संख्येने मृत्युमुखी पडत असल्याने राज्यकर्तेदेखील हतबल झाले आहेत. कोरोनामुळे परस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यास पुढच्यावर्षी आॅलिम्पिक होऊ शकणार नाही, असे तज्ज्ञांना वाटते.इव्हाटा म्हणाले, ‘आॅलिम्पिक आयोजनासाठी दोन अटी आहेत. पहिली अट जपानमध्ये कोरोनावर नियंत्रण यायला हवे. आणि दुसरी अट म्हणजे जगातही कोरोनाचा नायनाट व्हावा, कारण जगभरातून खेळाडू तसेच प्रेक्षक आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत.’(वृत्तसंस्था)

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020