शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ऑलिम्पिक स्थगित करण्याची अमेरिका, नॉर्वेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 01:58 IST

लॉस एंजिलिस/ओस्लो : कोरोनामुळे जनजीवन ढवळून निघाले असून, जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा ...

लॉस एंजिलिस/ओस्लो : कोरोनामुळे जनजीवन ढवळून निघाले असून, जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला असताना या व्हायरसवर पूर्ण नियंत्रण मिळवेपर्यंत टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणी अमेरिका आणि नॉर्वेने केली आहे.नॉर्वेच्या आॅलिम्पिक समितीने यासंदर्भात शुक्रवारी आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना पत्र लिहिले. या पत्रावर देशाच्या आॅलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आणि महासचिवाची स्वाक्षरी आहे. पत्रात त्यांनी लिहिले, ‘कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर जागतिक स्तरावर मात करण्याबची धडपड सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईस्तोवर टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये, असा आमचा आग्रह असेल.आम्ही देशातील तसेच आंतरराष्टÑीय स्तरावरील जनतेच्या आरोग्याबाबत चिंताग्रस्त आहोत. खेळाडूंसाठी ही आव्हानात्मक वेळ आहे. सर्वच देशांनी क्रीडा आयोजन आणि सराव तसेच तयारीदेखील स्थगित केली आहे. अशावेळी आॅलिम्पिकचा विचार करणे योग्य होणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.दुसरीकडे अमेरिकेच्या जलतरण महासंघाने अमेरिकन आॅलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीमार्फत टोकियो आॅलिम्पिक स्थगित करण्याची आयओसीकडे मागणी केली आहे. अमेरिकेच्या आॅलिम्पिक समितीचे सीईओ सारा हिर्शलॅन्ड यांना पाठविलेल्या विनंती पत्रात जलतरण महासंघाचे सीईओ टिम हिचे यांनी कोरोनामुळे टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन किमान वर्षभर लांबवीवर टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे.मायकेल फेल्प्स याला २८ पदके मिळवून देणारे कोच बॉब बोमॅन यांनीदेखील आॅलिम्पिक स्थगित करण्याची मागणी केली. त्यांनी देशातील जलतरण महासंघाच्या मागणीला स्वत:चा पाठिंबा दर्शविला आहे. खेळाडूंची कामगिरीच नव्हे तर त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेता आॅलिम्पिकला स्थगिती देणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोमॅन यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)फ्रान्सच्या जलतरण संघटनेकडूनही मागणीपॅरिस : अमेरिका आणि नॉर्वेतील जलतरण संघटनेच्या मागणीनंतर फ्रान्सच्या जलतरण महासंघाने देखील कोरोना व्हायरमुळे टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन स्थगित करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. फ्रान्सच्या जलतरण महासंघाने आपल्या कार्यकारी समितीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स केल्यानंतर सध्याची स्थिती आॅलिम्पिक आयोजनास अनुकूल नसल्याचे म्हटले आहे. आॅलिम्पिक आयोजन स्थगित करण्याबाबत विचार व्हायला हवा, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या