शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व झाले ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 05:13 IST

कोरोना विषाणूमुळे यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली, याशिवाय टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक डब्ल्यूटीए, एटीपी स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या.

- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रीडाविश्व ठप्प पडले असून, कुठेही कोणतीही स्पर्धा सुरू नाही आणि याची आवश्यकताही होती. जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) या आजाराला महामारी घोषित केले आहे. यामुळे कुठेही क्रीडा महोत्सव किंवा स्पर्धेचे आयोजन होत नाहीए. कारण क्रीडा स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि अशा परिस्थितीत संक्रमणाचा धोका खूप मोठा असतो. त्यामुळेच क्रीडाविश्वाने काही दिवस थांबण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मला वाटते. अर्थात, हा निर्णयही टप्प्याटप्प्याने झाला. काही स्पर्धा पार पडल्या, तर काही क्रीडा स्पर्धा, सोहळे प्रेक्षकांविना पार पडले. शेवटी प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, जर कोणी जीवितच राहिला नाही, तर क्रीडा स्पर्धा बघायला येणार कोण? त्यामुळे काही दिवस क्रीडा घडामोडी थांबविण्याचा निर्णय चांगलाच झाला.कोरोना विषाणूमुळे यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली, याशिवाय टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धांसह अनेक डब्ल्यूटीए, एटीपी स्पर्धाही पुढे ढकलण्यात आल्या. क्रिकेटमधील अनेक दौरे, फुटबॉल लीग अशा अनेक स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. त्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तो आॅलिम्पिकचा. आॅलिम्पिक वेळेनुसार होणार की नाही? हाच सर्वात मोठा प्रश्न क्रीडाविश्वाला सध्या भेडसावत आहे. २४ जुलैपासून आॅलिम्पिक सुरू होणार असून, त्या आधी कोरोनाची समस्या सुटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. त्याच वेळी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओए) आणि जपान आॅलिम्पिक समिती दोघांचेही निर्धारित वेळेनुसार आॅलिम्पिक आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण कोरोना विषाणूमुळे संपूर्ण क्रीडाविश्वाचे वेळापत्रक बिघडले आहे.कोरोना विषाणूने सर्वांनाच चिंतेत टाकले असून, मी स्वत:लाही सर्वांपासून वेगळे ठेवले आहे. या दरम्यान मी काही पुस्तके वाचत आहे, तसेच क्रिकेट आॅस्टेÑलियावर आधारित वेब सीरिजही पाहत आहे. क्रीडाविश्वाची नवी माहिती घेत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा विषय सर्वांनी अत्यंत गंभीरतेने घ्यावा. सरकारनेही रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे अवाहन केले आहे. सर्वांनी याचे पालन करावे आणि याचा अर्थ असा नाही होत की, तुम्ही दिवसभरात काहीच करायचे नाही. या दरम्यान आपल्या परिवारासह वेळ घालवा आणि सर्वात महत्त्वाचे समाजामध्ये वावरताना शक्यतो एकमेकांमध्ये अंतर ठेवा. स्वत:ची स्वच्छता राखा. सर्वांनी एकत्रित येऊन स्वत:ची काळजी घेतली, तर नक्कीच हा विषाणू रोखण्यात आपल्याला यश येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020