शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

corona virus :मलाही झाली आहे कोरोनाची बाधा, जपानी आॅलिम्पिक समिती उपप्रमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 04:19 IST

जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांनी स्वत:हून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जाहीर केले. यामुळे आता जपान ऑलिम्पिक स्पर्धेचे सुरक्षितपणे आयोजन करण्यात सक्षम आहे की नाही? यावर उलटसुलट चर्चा क्रीडाविश्वात रंगत आहेत.

टोकियो - जगभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या थैमानामुळे बहुतेक स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर, यंदाची आॅलिम्पिक स्पर्धा होणार की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, मंगळवारी जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांनी स्वत:हून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जाहीर केले. यामुळे आता जपान ऑलिम्पिक स्पर्धेचे सुरक्षितपणे आयोजन करण्यात सक्षम आहे की नाही? यावर उलटसुलट चर्चा क्रीडाविश्वात रंगत आहेत.एका निवेदनाद्वारे ताशिमा यांनी सांगितले की, ‘मी कोरोना विषाणू संक्रमणाची चाचणी केली होती आणि अहवालात मला या विषाणूची लागण झाल्याचे कळाले. मला हलकासा ताप होता. न्यूमोनियाचे लक्षण होते, पण आता मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या निर्देशांचे मी पालन करेन.’ या आधी जपानी अधिकारी सातत्याने आॅलिम्पिक स्पर्धा निर्धारित वेळापत्रकानुसार जुलै-आॅगस्टमध्ये होतील, असे सांगत होते. मात्र, आता खुद्द त्यांच्या आॅलिम्पिक समितीच्या उपप्रमुखांनाच कोरोनाची लागण झाल्याने, पुन्हा एकदा आॅलिम्पिक आयोजनावर शंका उपस्थित झाली आहे.ताशिमा यांनी पुढे सांगितले की, ‘मी २८ फेब्रुवारीपासून व्यावसायिक दौऱ्यावर होतो. यावेळी सर्वप्रथम मी बेलफास्ट येथे गेलो आणि नंतर अ‍ॅमस्टरडॅम येथे गेलो. तिथे प्रत्येक जण गळाभेट घेत होते, हस्तांदोलन करत होते.’ यानंतर ते अमेरिकेला गेले आणि तेथून ८ मार्चला जपानला परतले, अशी माहितीही ताशिमा यांनी दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020