शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: 'तबलिगी जमात'वरून बबिता फोगाट अन् स्वरा भास्कर यांच्यात 'दंगल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 15:16 IST

कोरोनाचा प्रसार करण्यात ही मागास जमातच पुढे का? बबिताचा प्रतिप्रश्न

भारताची कुस्तीपटू बबिता फोगाटनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची बरीच चर्चा सुरू आहे. तिनं तबलिगी जमातवर टीका करताना देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढण्यास ते कारणीभूत असल्याचा आरोप केला. या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकाही होत आहे, तर अनेक जण तिच्या समर्थनातही उतरले आहेत. या मुद्द्यावरून आता बबिता फोगाट आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यात सोसल मीडियावर 'दंगल' रंगल्याचे पाहयला मिळत आहे.

''कोरोना वायरस भारत की दूसरे नंबर की सबसे बड़ी समस्या है। जाहिल जमाती अभी भी पहले नंबर पर बना हुआ है।#jahiljamati,'' असं ट्विट तिनं 15 एप्रिलला केलं होतं. त्यानंतर तिला धमकीचे फोन, मॅसेज येऊ लागले. त्याला उत्तर देताना बबितानं 'तबलिगी जमात'च्या लोकांचा चांगलाच समाचार घेतला. 

ती म्हणाली,''माझ्या पोस्टनंतर मला धमकी देणारे फोन, मॅसेज येत आहेत. त्यांनी मी सांगू इच्छिते की तुमच्या धमकीला घाबरणारी मी झायरा वसीम नाही. तुमच्या धमकीला मी घाबरणार नाही. देशासाठी मी नेहमी लढत आली आहे आणि यापुढेही लढणार. माझ्या ट्विटमध्ये मी काहीच चुकीचं म्हटलेलं नाही आणि त्या विधानावर मी कायम आहे. तुम्हाला मी विचारते की तबलिगी जमात वाल्यांनी कोरोना संक्रमणला पसरवलं नसतं, तर आतापर्यंत हिंदुस्थानातून कोरोना व्हायरस नष्ट झाला असता. काही लोकांना सत्य कडू लागतं, पण मी सत्य बोलणं सोडणार नाही.'' तिच्या या विधानाचा स्वरा भास्करनं समाचार घेतला. ती म्हणाली,''बबिताजी जरा ही आकडेवारीही पाहा. क्या या भक्तांची कोरोना चाचणी झाली होती? कृपया याचवरही विधान करा. तबलिगी जमातच्या लोकांना कार्यक्रमासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलीच का? हा प्रश्न पण विचारा. आम्ही तुमचे फॅन आहोतच.'' त्यावर बबितानं तिला उलट प्रश्न केला. तिने विचारले,''135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला कोरोना संकटापासून वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दिल्लीतून लाखो कामगार बिहार आणि उत्तर प्रदेशसाठी रवाना झाले आहेत. पण, कोरोनाचा प्रसार करण्यात ही मागास जमातच आघाडीवर का आहे?''   

टॅग्स :Babita Kumari Phogatबबिता फोगाटSwara Bhaskarस्वरा भास्करcorona virusकोरोना वायरस बातम्या