शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Copa América final : ब्राझील-अर्जेंटिना भिडणार जेतेपदासाठी, हायव्होल्टेज फायनलची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 11:46 IST

रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी शनिवारी एकमेकांना आव्हान देतील.

ब्यूनस आयर्स : दोन फुटबॉलवेड्या देशांमध्ये रंगणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत सध्या जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहे. नेमारचा ब्राझील आणि मेस्सीचा अर्जेंटिना संघ जेव्हा अंतिम लढतीत एकमेकांसमोर उभे राहतील, त्यावेळी जगभरातील फुटबॉलप्रेमी टीव्हीसमोर ठाण मांडून बसतील.

रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी शनिवारी एकमेकांना आव्हान देतील. कोरोना महामारीमुळे ऐनवेळी ब्राझीलला या स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले आणि त्यानंतर देशभरात या यजमानपदाचा विरोध होत असतानाही ब्राझीलने अंतिम फेरी गाठली. गतविजेत्या ब्राझील व अर्जेंटिना यांनी मिळून आतापर्यंत एकूण ७ विश्वचषक आणि २३ कोपा अमेरिका स्पर्धा जिंकल्या. अर्जेंटिनाकडून सर्वाधिक आशा लिओनेल मेस्सीवर असतील. मेस्सीला राष्ट्रीय संघाकडून खेळताना एकही मोठे जेतेपद मिळवता आलेले नाही. २००७, २०१५ व २०१६ साली कोपा अमेरिका स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१४ च्या विश्वचषक उपविजेत्या  संघातही मेस्सीचा सहभाग होता.

अंतिम फेरीत ब्राझील वरचढ !अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यामध्ये अनेक सामने झाले असले, तरी कोणत्याही स्पर्धेत ते केवळ चार वेळाच अंतिम फेरीत भिडले आहेत. १९३७ सालच्या दक्षिण अमेरिकी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलला २-० नेनमवले होते. यानंतर २००४ च्या कोपा अमेरिका अंतिम लढतीत ब्राझीलने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारली होती. त्यानंतर एका वर्षाने जर्मनीत झालेल्या कॉन्फेडरेशन कप अंतिम लढतीत ब्राझीलने अर्जेंटिनाला ४-१ असा धक्का दिला होता. तसेच २००७ साली कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ब्राझीलने अर्जेंटिनावर ३-० असे वर्चस्व राखले होते. 

टॅग्स :FootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिनाBrazilब्राझील