नवी दिल्ली : एका राष्ट्रीय दैनिकाच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भारताचा अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तक्रार करण्यात आली आहे़ त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे़ज्या पत्रकाराबद्दल कोहलीने अपशब्द वापरला, त्याने वृत्तसंस्थेला सांगितले, की आमच्या दैनिकाच्या मुख्य संपादकांशी चर्चा केल्यानंतर मी बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांना एक पत्र लिहिले आहे़ यामध्ये या प्रकरणात हस्तक्षेप करून कोहलीवर योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे़ तसेच, या प्रकरणाची आयसीसीकडेसुद्धा तक्रार करण्यात आली आहे़ कोहलीने पत्रकाराविरुद्ध अपशब्द वापरून आॅस्ट्रेलियन कायद्याचा भंग केला आहे किंवा नाही, हे पडताळून पाहिले जात आहे़ त्यानंतर या स्टार क्रिकेटपटूविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही हा पत्रकार म्हणाला़ दरम्यान, विराटचा मंगळवारी तोल सुटला. सराव सत्र आटोपून आल्यानंतर समोर दिसलेल्या एका पत्रकाराला पाहून त्याने थेट शिवराळ भाषा वापरण्यास सुरुवात केली. संघातील इतर सदस्यांसह संबंधित पत्रकारदेखील अचानक झालेल्या या शाब्दिक हल्ल्याने बुचकळ्यात पडला होता. अनुष्का शर्माविषयी एका राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून कोहली नाराज होता. (वृत्तसंस्था)कोहलीने शिवीगाळ प्रकरणी माफी मागितली आहे; त्यामुळे आता या मुद्द्याला जास्त महत्त्व देऊ नये़ भारतीय खेळाडूंसाठी वर्ल्डकप महत्त्वाचा आहे़ खेळाडूंनी आता पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करावे़ - अनुराग ठाकूर, सचिव, बीसीसीआय
कोहलीविरुद्ध आयसीसी, बीसीसीआयकडे तक्रार
By admin | Updated: March 4, 2015 23:50 IST