शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Commonwealth Games 2022 : भारताच्या अजय सिंगने सर्वस्वी पणाला लावले, १ किलोच्या फरकाने पदक हुकले; पण, पाकिस्तानी स्पर्धकाला लोळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:22 IST

Commonwealth Games 2022 Weighlifting Ajay Singh :  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी पदकाचा सपाटा कायम राखला आहे.

Commonwealth Games 2022 Weighlifting Ajay Singh :  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी पदकाचा सपाटा कायम राखला आहे. ३ गोल्ड, २ रौप्य व १ कांस्य अशा सहा पदकांत आता आणखी एक भर पडेल असे आश्वासक चित्र अखेरच्या टप्प्यापर्यंत होते. ८१ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत भारताच्या अजय सिंगने पदकासाठी  सर्वस्व पणाला लावले, परंतु १ किलोच्या फरकाने त्याचे कांस्यपदक हुकले. दरम्यान, लॉन बॉल स्पर्धेत भारताच्या चार सदस्यीय महिला संघानेही उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर १६-१३ असा चुरशीचा विजय मिळवून या क्रीडा प्रकारातील पहिले पदक निश्चित केले आहे. 

८१ किलो वजनी गटात भारताच्या अजय सिंगने स्नॅच प्रकारात पहिल्या दोन प्रयत्नात १३७ व १४० किलोचा भार उचलला आहे.  तीन प्रयत्नांअंती अजय सिंग १४३ किलो भार उचलून दुसऱ्या क्रमाकांवर राहिला. ऑस्ट्रेलियाच्या कायले ब्रुसचा १४७ किलोचा प्रयत्न अयशस्वी ठरला अन् त्याला पहिल्या प्रयत्नातील १४३ किलो वजनावर समाधान मानवे लागले. इंग्लंडच्या क्रिस मरेने १३८, १४१ व १४४ किलो असा भार वाढवून स्नॅच प्रकारात अव्वल  स्थान कायम राखले. अजय व कायले हे १ किलोच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 

स्नॅच प्रकारात १३५ किलोवर समाधानी राहिलेल्या पाकिस्तानच्या हैदर अलीने क्लिन अँड जर्कमध्ये १७० किलो वजन उचलून एकूण ३०५ किलोसह अव्वल स्थान पटकावले. पण, भारताच्या अजयने पहिल्याच प्रयत्नात १७२ किलो भार उचलताना ३१५ किलोसह आघाडी घेतली. क्लिन अँड जर्कच्या दुसऱ्या प्रयत्नात अजने स्वतःसमोर १७६ किलोचे लक्ष्य ठेवले. कारण, इंग्लंडच्या क्रिस मरेने १७४ किलो उचल करून ३१८ किलो वजनासह अव्वल क्रमांकावर झेप घेतली. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या ब्रुसने १७५ किलो भार उचलला व त्याचेही एकूण ३१८ किलो झाले.  अजयने दुसऱ्या प्रयत्नात १७६, तर मरेने १७८ किलो भार उचलल्याने दोघांची एकूण किलो संख्या अनुक्रमे ३१९ व ३२२अशी झाली. ब्रुसने १८० किलो भार उचलून ३२३ सह आघाडी घेतली. कॅनडाच्या निकोलस वाचोनच्या १८० किलो भार उचलल्याने भारताचा अजय चौथ्या स्थानी सरकला. अखेरच्या प्रयत्नात अजयला 180 किलो भार उचलण्यात अपयश आले अन् थोडक्यात भारताचे पदक हुकले.

१७ एप्रिल १९९७ मध्ये राजस्थान येथे जन्मलेल्लाय अजयने धावपटू म्हणून क्रीडा कारकीर्दिची सुरुवात केली होती, परंतु आर्मीमध्ये असलेल्या त्याच्या काकांनी त्याला वेटलिफ्टिंग करण्याचा सल्ला दिला. त्याला तोपर्यंत वेटलिफ्टिंग खेळ अस्तित्वात आहे, हेही माहीत नव्हते. त्यामुळे त्याच्या तांत्रिक बाजू समजून घेण्यासाठीच त्याला २-३ वर्ष लागली. सुबेदार राजेंदर यांनी त्याला मदत केली.  २०१५मध्ये सर्वप्रथम त्याने राष्ट्रीय स्पर्धेत पहिले पदक पटकावले आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. २०१९ व २०२१च्या राष्ट्रकुल सीनियर चॅम्पियनशीप स्पर्धेत त्याने पदक जिंकले. २०१९मध्ये अजयने एकूण ३१८ ( १४८+१९०) वजय उचलून राष्ट्रीय विक्रम नावावर केला होता.   राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेची दोन सुवर्णपदकं त्याच्या नावावर आहेत. त्याने तष्कंतला २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत ३२२ किलो भार उचलून स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला.  

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाWeightliftingवेटलिफ्टिंग