शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
3
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
4
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
5
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
6
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
7
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
8
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
9
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
10
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
11
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
12
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
13
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
15
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
16
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
17
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
18
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
19
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
20
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

Commonwealth Games 2022 : अचंथा शरथ कमलचे विक्रमी ११ वे पदक; टेबल टेनिसमध्ये लिहिला इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 7:55 PM

भारताने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तिहेरी उडीत सुवर्ण व रौप्य, १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्य, महिलांच्या भालाफेकीत कांस्य आणि महिला हॉकीत कांस्य अशी ८ पदकांची कमाई केली होती.

Commonwealth Games 2022 Table Tennis : पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात अचंथा शरथ कमल व साथियन ज्ञानसेकरन ( ACHANTA Sharath Kamal / GNANASEKARAN Sathiyan) या जोडीने विक्रमी पदक जिंकले. भारताने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तिहेरी उडीत सुवर्ण व रौप्य, १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्य, महिलांच्या भालाफेकीत कांस्य आणि महिला हॉकीत कांस्य अशी ८ पदकांची कमाई केली होती. त्यात टेबल टेनिसच्या पदकाची भर पडली. शरथ कमल व साथियन यांना या पदकासाठी संघर्ष करावा लागला.  इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल व लिएम पिचफोर्ड यांनी कडवी टक्कर दिली. भारतीय जोडीने पहिला गेम ११-८ असा जिंकला, परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी पुढील दोन गेम ११-८ व ११-३ असे जिंकून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे चौथा गेम निर्णायक होता आणि त्यात भारतीय जोडीने झोकून खेळ केला. हा गेम ११-७ असा जिंकून भारताने लढत २-२ अशी बरोबरीत आणली. पाचव्या गेममध्ये ३-३ अशा बरोबरीनंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी ८-४ अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या जोडीने ११-४ असा विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

शरथ कमलने आतापर्यंत सहभाग घेतलेल्या प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. टेबल टेनिस संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या शरथ कमलने आतापर्यंत ५ सुवर्ण, दोन रौप्य व ३ कांस्य अशी एकूण १० पदकांची कमाई केली आहे. २००६मध्ये त्याने पुरुष एकेरीत व पुरुष सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. २०१०मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण, २०१८ व २०२२ मध्ये पुरूष सांघिक गटाचे सुवर्ण त्याच्या नावावर आहे. २०१४ व २०१८मध्ये पुरुष दुहेरीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१०मध्ये पुरुष सांघिक, २०१८मध्ये पुरुष एकेरी व २०१८ मिश्र दुहेरीत कांस्य जिंकले आहे. 

#TableTennis भारताच्या युवा टेबल टेनिसपटू श्रीजा अकुलाला चिवट खेळीनंतर कांस्यपदकाच्या लढतीत हार मानावी लागली. श्रीजाला महिला एकेरीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या यांगजी लियूकडून ११-३, ६-११, २-११, ११-७, १३-१५, ११-९, ७-११ असा पराभव पत्करावा लागला. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTable Tennisटेबल टेनिस