Commonwealth Games 2022 Lawn Bowls : लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. लॉन बॉल ( Lawn Bowls) हा क्रीडा प्रकार कालपर्यंत भारतीयांच्या परिचयाचाही नव्हता, परंतु या चार महिलांनी ऐतिहासिक पदक निश्चित करताच याची चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. CWG2022 भारताचे हे एकूण चौथे सुवर्णपदक ठरले. भारताच्या खात्यात ४ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण १० पदकं झाली आहेत आणि पदक तालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहेत. आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी सॉलिड खेळ केला.
सातव्या फेरीत भारताला १ गुण मिळवता आला, परंतु त्यांची आघाडी ८-२ अशी भक्कमच राहिली. आठव्या फेरीत आफ्रिकेने पिछाडी ४-८ अशी कमी केली. त्यामुळे आता नवव्या व अखेरच्या फेरीकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते. अखेरच्या फेरीत आफ्रिकेने जबरदस्त खेळ केला, भारताला आघाडी कायम राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती. नवव्या फेरीत आफ्रिकेने ६-८ अशी चुरस निर्माण केली. १०व्या फेरीत आफ्रिकन संघाचे चेंडू जॅक चेंडूच्या सर्वाधिक जवळ होते आणि त्यामुळे सामना ८-८ असा बरोबरीचा आला. ११व्या फेरीत पिंकीने कमालीचा चेंडू सरकवला अन् Jack च्या अगदी जवळ पोहोचवले. पण, ११व्या फेरीनंतर आफ्रिकेने १०-८ अशी आघाडी घेतली.
लॉन बॉल कसा खेळतात, जाणून घ्या सोप्या भाषेत!
Jack ( पिवळा चेंडू) याच्या जितक्या जवळ आपला चेंडू पाठवता येईल, तितके संघाच्या फायद्याचे.