शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

CWG 2022:१३० कोटी देशवासीयांच्या अपेक्षांचा 'भार' समर्थपणे पेलणारे शिलेदार; भारतासाठी पदक जिंकणारे वेटलिफ्टर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 10:36 IST

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

बर्गिंहॅम : इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) चे आयोजन करण्यात आले आहे, जिथे जगभरातील ७२ देशातील थलीट सहभागी झाले आहेत. भारतीय खेळाडूंनी देखील आपल्या देशाची शान वाढवत बर्गिंहॅमच्या धरतीवर तिरंगा फडकवला आहे. भारताला आतापर्यंत या स्पर्धेत एकूण ९ पदके मिळाली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भारताने सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमधून जिंकली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या संकेत सरगरने रौप्य पदक पटकावून भारताचे खाते उघडले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताने एकूण सात पदक जिंकली आहेत. 

दरम्यान, वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या मीराबाई चानू, अंचिता शेऊली आणि युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे. १९ वर्षीय युवा खेळाडू जेरेमी लालरिनुंगाने ६७ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. तर महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू हिने देशाला सुवर्णकमाई करून दिली. तसेच पुरूष वेटलिफ्टर संकेत सरगर आणि गुरूराजा पुजारी या दोघांनी भारताला अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकून दिले होते. भारतीय खेळाडूंकडून वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट सुरूच आहे. कारण सोमवारी वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने भारताला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले आहे. पश्चिम बंगालच्या देऊलपूर गावात मध्यमवर्गीय कुटुंबातील अंचिता शेऊली हिने भारतासाठी सुवर्ण भार उचलला होता. त्यामुळे वेटलिफ्टिंगमध्ये भारताने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली आहेत. 

वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारे भारतीय खेळाडू 

  1. मीराबाई चानू (सुवर्ण पदक)
  2. जेरेमी लालरिनुंगा (सुवर्ण पदक) 
  3. अंचिता शेऊली (सुवर्ण पदक) 
  4. संकेत सरगर (रौप्य पदक) 
  5. बिंद्यारानी देवी (रौप्य पदक) 
  6. गुरूराजा पुजारी (कांस्य पदक) 
  7. हरजिंदर कौर (कांस्य पदक) 

 

भारतीय खेळाडूंचा डंकामहाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील संकेत महादेव सरगर याने भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. अतिशय गरीब घरातून देशाचे प्रतिनिधित्व करताना त्याने बर्गिंहॅममध्ये तिरंग्याची शान वाढवली. भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये नऊ पदके पटकावली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यातील सात पदके वेटलिफ्टिंग मधून मिळाली आहेत. मराठमोळ्या संकेत सरगरने रौप्य पदक आणि गुरूराजा पुजारीने ६१ किलो वजन श्रेणीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तसेच बिंद्यारानी देवीने रौप्य पदक जिंकले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने आतापर्यंत १३० पदके जिंकली आहेत. भारतापेक्षा जास्त पदके फक्त ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाGold medalसुवर्ण पदकMirabai Chanuमीराबाई चानूIndiaभारतEnglandइंग्लंडWeightliftingवेटलिफ्टिंगSilverचांदी