शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2022 : तेजस्वीन शंकरने उंच उडीत जिंकले भारतासाठी पहिले पदक, क्रिकेटपटू मिचेल स्टार्कच्या भावाकडून झाला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 01:37 IST

स्क्वॉशमध्ये एकेरीत पदक जिंकणारा सौरव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. मध्यरात्री तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar) उंच उडीत कांस्यपदकाची कमाई केली.

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी भारताच्या खात्यात तीन पदकांची भर पडली. वेटलिफ्टर लवप्रीत सिंग ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदक, स्क्वॉशपटू सौरव घोषालने पुरूष एकेरीत कांस्य आणि ज्युदोपटी तुलिका मानने विक्रमी रौप्यपदक जिंकले. स्क्वॉशमध्ये एकेरीत पदक जिंकणारा सौरव हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. मध्यरात्री तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar) उंच उडीत कांस्यपदकाची कमाई केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेजस्वीनचा अगदी अखेरच्या क्षणाला भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. उंच उडीतील भारताचे हे पहिलेवहिले पदक ठरले त्याशिवाय बॉक्सिंगमध्ये नितू पांघास, निखत झरीन व मोहम्मद हुस्सामुद्दीन यांनी आपापल्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून भारतासाठी तीन पदकं पक्की केली.  भारताच्या महिला हॉकी संघाने कॅनडावर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघाने ८-० अशा फरकाने कॅनडाचा धुव्वा उडवताना उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.  

पुरुषांच्या उंच उडीत तेजस्वीन शंकरने २.१०, २.१५ व २.१९ असे यशस्वी प्रयत्न केले. तेजस्वीन २.२२ मीटर उंच उडीसह पदक  शर्यतीत स्वतःला आघाडीवर राखले होते. पण, न्यूझीलंडच्या हामिश केर व ऑस्ट्रेलियाच्या ब्रेंडन स्टार्क यांनी २.२५ मीटर उंच उडी मारून आघाडी घेतली.  तेजस्वीनला २.२५ मीटरचे अंतर पार करता आले नाही. दोन प्रयत्न फसल्यानंतर तेजस्वीनच्या पदकाच्या आशा डोनाल्ड थॉमसवर होत्या आणि नशीबाची साथ मिळाली. बहरिनच्या या खेळाडूला तीनही प्रयत्नात २.२५ मीटर पार करता न आल्याने तेजस्वीनचे कांस्यपदक पक्के झाले. 

न्यूझीलंडच्या हामिश केरने सुवर्ण, तर ऑस्ट्रेलियाच्या ब्रेंडन स्टार्कने रौप्यपदक जिंकले. ब्रेंडन स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिचेल स्टार्क याचा भाऊ आणि महिला क्रिकेटपटू एलिसा हिली हिची दीर आहे. २०१८मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

कोण आहे तेजस्वीन शंकर?दिल्लीतील तमिळ कुटुंबातील तेजस्वीनचा जन्म.. ८व्या इयत्तेपर्यंत तो क्रिकेट खेळायचा, परंतु शारीरिक शिक्षणाच्या सरांनी त्याला उंच उडी शिकण्याचा सल्ला दिला आणि त्याने आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकही जिंकले. त्याचे वडील हरीशंकर हे वकील होते, परंतु २०१४ मध्ये रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले.  २०१५च्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेत त्याने २.१४ मीटर उंच उडीसह सुवर्णपदक जिंकले. २०१६ मध्ये दक्षिण आशियाई स्पर्धेत २.१७ मीटरसह रौप्यपदकाची कमाई केली. दुखापतीमुळे त्याला आशियाई कनिष्ट अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि जागतिक स्पर्धेला मुकावे लागले होते.  १७व्या वर्षी त्याने हरी शंकर रॉय यांचा १२ वर्ष जुना २.२५ मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडताना कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत २.२६ मीटरची नोंद केली. २०१८मध्ये त्याने इंडोअर राष्ट्रीय विक्रम मोडला आणि २.१८ मीटरची नोंद केली.   

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ