शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Commonwealth Games 2022 : पी व्ही सिंधू एकटी लढली, पण सुवर्ण पदकाने दिली हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 01:59 IST

Commonwealth Games 2022 Badminton Silver :  मिश्र सांघिक गटातील बॅडमिंटनच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मलेशियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत पी व्ही सिंधूने ( PV Sindhu) भारताला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली, पण...

Commonwealth Games 2022 Badminton : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारताने टेबल टेनिसमधील पुरुष सांघिक गटाचे सुवर्णपदक कायम राखले, महिलांनी लॉन बॉल या खेळात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावून दिले. वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरने ९६ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकताना सलग तिसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई केली. त्यामुळे आज मिश्र सांघिक गटातील बॅडमिंटनच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मलेशियाविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर महिला एकेरीच्या दुसऱ्या लढतीत पी व्ही सिंधूने ( PV Sindhu) भारताला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली, परंतु किदम्बी श्रीकांतला शर्थीचे प्रयत्न करूनही आघाडी मिळवून देता आली नाही. त्यापाठोपाठ महिला दुहेरीतही हार झाल्याने भारताला १-३ अशा फरकाने पराभवासह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

मिश्र सांघिक गटातील पहिल्या पुरुष दुहेरी लढतीत सात्विक साईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी कडव्या संघर्षानंतरही  मलेशियाच्या टेंग फाँग आरोन व वुई यिस सोह या जोडीकडून १८-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. मलेशियाने १-० अशी आघाडी घेतली. सात्विक व चिराग या जोडीला मलेशियन जोडीसमोर मागील पाच सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नव्हता. भारताला कमबॅक करून देण्याची जबाबदारी

ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूवर होती. तिच्यासमोर जिन वेई गोहचे आव्हान होते. दोघींमधील पहिला गेम कमालीचा चुरशीचा झाला. सिंधूला विजय मिळवणे वाटते तितके सोपे नक्की नाही, याचा अंदाज याच गेममध्ये आला. सिंधूने २२-२० असा विजय मिळवून आघाडी घेतली खरी, परंतु मलेशियन खेळाडू ऐकण्यातली नव्हती. दुसऱ्या गेममध्येही सुरुवातीला चुरस रंगली, परंतु सिंधूने आघाडी घेत हा गेम २१-१७ असा जिंकला अन् भारताने १-१ अशी बरोबरी मिळवली.   पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बी याच्यावर भारताला आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी होती आणि त्याच्यासमोर त्झे याँगचे आव्हान होते. मलेशियन खेळाडूने चिवट खेळ करताना पहिला गेम २१-१९ असा जिंकला. किदम्बीने दुसऱ्या गेममध्ये १७-६ अशी अनपेक्षित आघाडी घेत मलेशियन खेळाडूला हतबल केले. किदम्बीने हा गेम २१-६ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरी आणला. तिसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी दोन्ही खेळाडू संघर्ष करताना दिसले. ११-९ अशी आघाडी घेत याँगने टेंशन वाढवले होते. याँगने भारतीय खेळाडूच्या तंदुरुस्तीची चांगलीच परीक्षा घेतली आणि त्याला संपूर्ण कोर्टवर नाचवले. याँगने २१-१६ असा हा गेम घेताना मलेशियाची आघाडी २-१ अशी मजबूत केली. 

महिला दुहेरीत जॉली थ्रीसा व गायत्री गोपिचंद यांना पहिल्याच गेममध्ये १८-२१ अशा फरकाने कूंग ले पीर्ली व मुरलीधरन थिन्नाहकडून पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या गेममध्येही मलेशियाच्या जोडीने १३-८ अशी आघाडी घेत भारताच्या युवा खेळाडूंवर दडपण निर्माण केले.  भारतीय खेळाडूंनी हा गेम १७-१९ असा अटीतटीचा केला.  मलेशियन जोडीने १ गुण घेत मॅच पॉईंट मिळवला अन् २१-१७ असा विजय मिळवताना सुवर्णपदकावर नाव कोरले. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाBadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधू