शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018: तेजस्विनी सावंतचा अचूक निशाणा; सुवर्णपदकाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 08:38 IST

अंजुम मुदगिलनं पटकावलं रौप्यपदक

गोल्डकोस्ट: नेमबाज तेजस्विनी सावंतनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तेजस्विनीनं तिच्या अनुभवाच्या जोरावर ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात अव्वल स्थान पटकावलं. तेजस्विनीनं काल  ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं होतं. काल थोडक्यात हुकलेल्या सुवर्णपदकाला तेजस्विनीनं आज गवसणी घातली. तेजस्विनीनं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं असताना अंजुम मुदगिलनं भारतासाठी रौप्यपदक जिकलं. अंजुम आणि तेजस्विनीमध्ये सुवर्णपदकासाठी अटीतटीचा सामना झाला. दोन भारतीय नेमबाज सुवर्णपदकासाठी लढत असल्याचा 'सोनेरी' क्षण 'गोल्डकोस्ट'मध्ये पाहायला मिळाला. अखेर यामध्ये तेजस्विनीनं बाजी मारली. 

तेजस्विनीनं अचूक निशाणा साधत या स्पर्धेतील तिचं दुसरं पटकावलं. तिनं ४५७.९ गुणांची कमाई करत राष्ट्रकुल स्पर्धेत विक्रमाची नोंद केली. ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स प्रकारात भारताची अंजुम मुदगिलनं दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक जिंकलं. तिनं एकूण ४५५.७ गुण मिळवले. दोन भारतीय नेमबाजांपुढे इतर देशांच्या खेळाडूंचा फारसा निभाव लागला नाही. स्कॉटलंडची सेओनेड मकिनटोश तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तिला ४४४.६ गुणांची कमाई करता आली. तेजस्विनी आणि अंजुमनं या स्पर्धा प्रकारात संपूर्ण वर्चस्व राखल्याचं यावेळी पाहायला मिळालं. काल रौप्यपदक पटकावणाऱ्या तेजस्विनीनं आज सुवर्णपदकाला गवसणी घालत राष्ट्रकुल स्पर्धांमधील तिच्या पदकांची संख्या सातवर नेली. सध्या सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं आतापर्यंत दोन पटकांची कमाई केली आहे. तर याआधी २००६ साली मेलबर्नमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल (पेअर्स) प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. याशिवाय २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य, तर ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स आणि ५० मीटर रायफल प्रोन (पेअर्स) प्रकारात कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८