शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games 2018 : भारतीय बॅडमिंटनपटूकडून स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 14:17 IST

भारताच्या बॅडमिंटनटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

ठळक मुद्देपहिल्या लढतीत भारताच्या सायना नेहवालने महिला एकेरीमध्ये जुली मॅकफरसनवर 21-14, 21-12 असे सहज नमवले. त्यानंतर झालेल्या पुरुषांच्या एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांतने कायरन मेरिलेसवर 21-18, 21-2 असा दणदणीत विजय मिळवला.

गोल्ड कोस्ट : भारताच्या बॅडमिंटनटूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. शुक्रवारी आपल्या अखेरच्या साखळी लढतीत भारताने स्कॉटलंडचा 5-0 असा धुव्वा उडवला आहे.

पहिल्या लढतीत भारताच्या सायना नेहवालने महिला एकेरीमध्ये जुली मॅकफरसनवर 21-14, 21-12 असे सहज नमवले. त्यानंतर झालेल्या पुरुषांच्या एकेरीमध्ये किदम्बी श्रीकांतने कायरन मेरिलेसवर 21-18, 21-2 असा दणदणीत विजय मिळवला.

सायना आणि श्रीकांत यांच्या विजयानंतर भारताच्या सिक्की रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी महिला दुहेरीमध्ये स्कॉटलंडच्या किर्स्टी गि्लमोर आणि इलेनोर ओडोनेल यांच्यावर 21-8, 21-12 अशी सहज मात केली. भारताने हा सामना जिंकत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली.

स्कॉटलंडविरुद्धच्या चौथ्या लढतीतही भारताने सहज विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रानकीरेड्डी यांनी पॅट्रीक मॅचुक आणि अॅडम हॉल यांच्यावर 21-16, 21-16 अशी मात केली. त्यानंतर झालेल्या मिश्र दुहेरीमध्ये प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी आणि मार्टिन कॅम्पबेल आणि जुली मॅकफरसन यांच्यावर 21-17, 21-15 असा विजय मिळवला.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Saina Nehwalसायना नेहवाल