शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth 2022: उद्घाटन सोहळ्याच्या मध्येच लवलिना गेली निघून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 12:08 IST

सोहळा सुरू असताना आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही टॅक्सीची मागणी केली; पण टॅक्सी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले.’

 ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती भारतीय बॉक्सर लवलिना बोरगोहेन  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मध्येच निघून गेली. ही कृती तिच्या अंगलट आली. ती तब्बल दोन तास वाहतूक कोंडीत अडकली होती. भारतीय पथक प्रमुख राजेश भंडारी हे मात्र लवलिनावर नाराज दिसले. गुरुवारी रात्री दोन तासांहून अधिक काळ उद्घाटन सोहळा चालला. लवलिना आणि पथकातील सहकारी मोहम्मद हुसामउद्दीन हे अलेक्झांडर स्टेडियममधून क्रीडाग्रामकडे निघून गेले. उद्घाटन सोहळा मध्येच का सोडून दिला, असे विचारताच लवलिना म्हणाली, ‘शनिवारी मला सामना खेळायचा आहे. त्यासाठी सराव करणे गरजेचे आहे. सोहळा सुरू असताना आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही टॅक्सीची मागणी केली; पण टॅक्सी उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले.’

 समारंभ सुरू असल्याने या दोन्ही खेळाडूंना टॅक्सी  मिळाली नाही. आयोजकांनी भारतीय पथकाला बसेसशिवाय तीन कार उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र  टॅक्सीचे चालक उपलब्ध नव्हते. पथक प्रमुख आणि बॉक्सिंग महासंघाचे उपाध्यक्ष भंडारी हे लवलिनाच्या कृतीवर नाराज होते. ते म्हणाले, ‘हे दोन्ही खेळाडू येताना बसमधून आले होते. त्यांना लवकर परत जायचे होते तर त्यांनी संचलनात सहभागी व्हायला नको होते. अन्य भारतीय खेळाडू सरावामुळे येथे येऊ शकले नाहीत. याबाबत मी विचारणा करणार आहे.’  याआधी लवलिनाने आपला छळ सुरू असल्याचा आरोप केला होता. खासगी कोच संध्या गुरूंग यांना आधी रोखल्यामुळे वाद निर्माण झाला. नंतर संध्याला क्रीडाग्राममध्ये वास्तव्यास परवानगी देण्यात आली होती.  

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा