स्टेडियममध्ये कोसळले ड्रोन

By admin | Published: September 4, 2015 10:58 PM2015-09-04T22:58:05+5:302015-09-04T22:58:05+5:30

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या लुई आर्मस्ट्राँग स्टेडियममध्ये एका सामन्यादरम्यान वर हवेत असणारे ड्रोन नंतर स्टेडियममधील रिकाम्या असणाऱ्या खुर्च्यांवर कोसळले.

The collapsed drone in the stadium | स्टेडियममध्ये कोसळले ड्रोन

स्टेडियममध्ये कोसळले ड्रोन

Next

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या लुई आर्मस्ट्राँग स्टेडियममध्ये एका सामन्यादरम्यान वर हवेत असणारे ड्रोन नंतर स्टेडियममधील रिकाम्या असणाऱ्या खुर्च्यांवर कोसळले. अमेरिकन टेनिस महासंघाचे प्रवक्ते ख्रिस विडमेयर यांनी त्यात कोणीही जखमी झाले नसून न्यूयॉर्क पोलीस याचा तपास करीत असल्याचे सांगितले.
इटलीचा फ्लेविया पेनेटा आणि रोमानियाची मोनिका निकोलेस्कू यांच्यादरम्यान सामना सुरू असताना ही घटना घडली. या सामन्यात ६-१, ६-४ असा विजय मिळवणाऱ्या पेनेटा हिने ड्रोन हवेत झेप घेण्याविषयी ऐकले होते; परंतु ते काय होते याविषयी निश्चित आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे तिची सुरुवातीची प्रतिक्रिया ही बॉम्ब असू शकतो अशी होती. ती म्हणाली, ‘माझ्या मते ते खूप भयावह होते.’ चेअर अम्पायर आणि स्पर्धेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने ते खरोखरीच ड्रोन होते हे सांगितले नाही, असेही ती म्हणाले. ड्रोन कोसळल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे झाले. त्यामुळे सामन्यात थोडा व्यत्यय आला. तसेच पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारीदेखील तेथे दाखल झाले.
ही घटना रात्री ८ वाजून ३0 मिनिटांनी झाली. त्या वेळेस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर दिवसाचा अखेरचा सामना सुरू होता. या स्टेडियमची क्षमता १0 हजारांची आहे. पेनेटा आणि निकोलेस्कू हे पहिल्या कोर्ट नंबर १७ वर खेळणार होते; परंतु आर्मस्ट्राँगवरील आधीचा सामना लवकर झाल्यामुळे येथे त्यांचा सामना खेळवला गेला.

Web Title: The collapsed drone in the stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.