शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

क्रिकेटर्स रूपेरी पडद्यावर क्लीनबोल्ड!

By admin | Updated: August 10, 2016 02:10 IST

क्रिकेट आणि सिनेमा यांचं नातं काही वेगळंच. या दोन्ही गोष्टी अशा आहेत की ज्यावर रसिक सर्वाधिक प्रेम करतात. क्रिकेटर्स आणि कलाकारांवर तर रसिक जीव अक्षरक्ष: ओवाळून टाकतात

क्रिकेट आणि सिनेमा यांचं नातं काही वेगळंच. या दोन्ही गोष्टी अशा आहेत की ज्यावर रसिक सर्वाधिक प्रेम करतात. क्रिकेटर्स आणि कलाकारांवर तर रसिक जीव अक्षरक्ष: ओवाळून टाकतात. कलाकारांना क्रिकेटच्या मैदानावर चौकार, षटकारांचा आनंद घेताना अनेकांनी पाहिलंय. मात्र आपल्या खेळानं क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या काही क्रिकेटर्सनाही सिनेमा आणि बॉलीवूडची भूरळ पडते. आपल्या फास्ट बॉलिंगनं जगभरातल्या क्रिकेटर्सना नाचवणारा आॅस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट ली याच्यावरही बॉलीवूडनं जादू केलीय. ब्रेट लीचा ‘अन इंडियान’ हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. ब्रेट लीच्या आधी काही भारतीय क्रिकेटर्सनीसुद्धा चक्क सिनेमात काम केलं. पाहू या कोण आहेत असे क्रिकेटर ज्यांनी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची सेकंड इनिंग खेळली.बॉलिवूडच्या सिनेमात नशीब आजमावणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत पहिलं नाव येतं ते क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचं. आपल्या षटकारांसाठी प्रसिद्ध असलेल्या दुरार्नी यांनी 1973 साली बी.आर. इशारा यांच्या ‘चरित्र’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. या सिनेमात त्यांची नायिका होती परवीन बाबी. स्मार्ट, उत्तम बॉडी असणाऱ्या दुर्रानी यांची अभिनयातील ही नवी इनिंग मात्र रसिकांना काही भावली नाही.दुर्रानी यांच्यानंतर भारतीय क्रिकेट टीमचे आणखी एक क्रिकेटर संदीप पाटील यांनाही रुपेरी पडद्याने आकर्षित केलं. 1985 साली आलेल्या ‘कभी अजनबी थे’ या सिनेमात अभिनेत्री पूनम ढिल्लोसह संदीप पाटील रोमान्स करताना पाहायला मिळाले. संदीप पाटील यांचे भारतीय टीममधील सहकारी आणि यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनीही ‘कभी अजनबी थे’ याच सिनेमातून आपल्या अभिनयाची इनिंग सुरू केली. संदीप पाटील सिनेमाचे नायक तर किरमाणी यांनी या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. यानंतर 2012 साली किरमाणी यांनी एका मल्याळी सिनेमातही काम केलं.भारतीय क्रिकेट टीमचे विक्रमादित्य आणि लिटील मास्टर सुनील गावसकर यांनाही सिनेमाचा मोह आवरला नाही. 1980 साली रूपेरी पडद्यावर आलेल्या ‘सावली प्रेमाची’ या मराठी सिनेमातून गावसकर यांनी अभिनयाची इनिंग सुरू केली. यानंतर 1988 साली आलेल्या ‘मालामाल’ या सिनेमातही त्यांनी नसिरुद्दीन शाह यांच्यासह काम केलं.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मित्र आणि भारतीय क्रिकेट टीमचा आणखी एक क्रिकेटर विनोद कांबळीनंही बॉलिवूडच्या सिनेमातून आपली इनिंग सुरू केली. 2002 साली रुपेरी पडद्यावर आलेल्या ‘अनर्थ’ सिनेमातून कांबळीनं हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री केली. संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्यासारख्या कलाकारांसह काम करत कांबळीनं आपली वेगळी छाप पाडली.भारतीय क्रिकेट टीममध्ये फार काळ स्थान मिळवू न शकलेल्या क्रिकेटर सलील अंकोलाची अभिनयाची इनिंग मात्र हिट ठरली. ‘कुरुक्षेत्र’, ‘पिता’, ‘चुरा लिया है तुमने’ अशा सिनेमांमध्ये अंकोलानं काम केलंय. शिवाय ‘करम अपना अपना ही’ मालिका तसंच रियालिटी शो आणि म्युझिक अल्मबमध्येही अंकोलाची जादू पाहायला मिळाली.मॅच फिक्सिंग प्रकरणात नाव आल्यामुळं क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात आल्यानं क्रिकेटर अजय जडेजानं आपला मोर्चा अभिनय क्षेत्राकडे वळवला. सेलिना जेटली, सनी देओल आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘खेल’ या सिनेमातून जडेजानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.1983च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनाही रसिकांनी बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर पाहिलंय. ‘स्टम्प्ड’, ‘इक्बाल’, ‘चैन खुली की मैन खुली’ या सिनेमातून कपिल देव यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. याशिवाय ‘मुझसे शादी करोगी’ या सिनेमात नवज्योतसिंग सिद्धू, हरभजन सिंग, इरफान पठाण, आशिष नेहरा, पार्थिव पटेल, मोहम्मद कैफ, जवगल श्रीनाथ या क्रिकेटर्सनी गेस्ट अपिएरन्स दिला होता.