शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

क्ले कोर्ट बादशाह ‘राफा’चे विक्रमी जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:10 AM

माँटे कार्लो टेनिस; अंतिम सामन्यात जपानच्या केई निशिकोरीचा उडवला धुव्वा

माँटे कार्लो : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल याने तुफानी खेळ करताना माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विक्रमी ११व्यांदा जेतेपद पटकावले. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात नदालने जपानच्या केई निशिकोरीचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला.अंतिम सामन्यात चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा टेनिसप्रेमींना होती. मात्र नदालच्या धडाकेबाज खेळापुढे निशिकोरीचा काहीच निभाव लागला नाही. नदालने सुरुवातीपासून राखलेला आक्रमक पवित्रा अखेरपर्यंत कायम राखत निशिकोरीचा ६-३, ६-२ असा फडशा पाडला. याआधी उपांत्य सामन्यातही नदालने एकतर्फी विजय मिळवताना ग्रिगोर दिमित्रोवचा ६-४, ६-१ असा धुव्वा उडवला होता. त्याचवेळी, निशिकोरीने अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवविरुद्ध ३-६, ६-३, ६-४ असा झुंजार विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. माझ्या सामन्याचा निकाल शानदार ठरला, पण हा सामना सामान्य नक्कीच नव्हता. निशिकोरी जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. विशेष करून तो क्ले कोर्टवर खूप चांगला खेळतो. सध्या मी या क्षणांचा आनंद घेणार असून, त्यानंतर पुढच्या स्पर्धेचा विचार करेन. - राफेल नदालनदालचा विश्वविक्रमनदालने या शानदार जेतेपदासह कोणत्याही एका स्पर्धेत सर्वाधिक जेतेपद पटकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला. एकाच स्पर्धेत ११ जेतेपद पटकावणारा नदाल पहिला खेळाडू ठरला.याआधी त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेचे विक्रमी दहावेळा जेतेपद उंचावले आहे. यासह नदालने जागतिक क्रमवारीतील आपले अव्वल स्थानही कायम राखले. नदालचे हे ७६वे एटीपी टूर जेतेपद असून, ३१वे मास्टर्स जेतेपद आहे.यासह त्याने सर्बियाचा स्टार नोव्हाक जोकोविचच्या ३१ मास्टर्स जेतेपदांच्या विक्रमाचीही बरोबरी केली. नदाल आता पुढील आठवड्यात रंगणाऱ्या बार्सिलोना स्पर्धेसाठी सज्ज होईल.

टॅग्स :Sportsक्रीडा