फतुल्ला : बांगलादेशविरुद्ध पावसाच्या व्यत्ययामुळे आज अनिर्णीत संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला ‘टीम डिनर’ दिले. सूत्रानी सांगितले की, ‘शास्त्री यांनी ढाका येथील आलिशान एका क्लबमध्ये संघाला डिनर दिले. संघातील सदस्यांनी सांगितले की, नैतिकतेचा विचार केला तर या लढतीत आम्ही वर्चस्व गाजवले. या लढतीत यजमान संघ दडपणात असल्याचे दिसून आले. डिनर आयोजित करण्याचे आणखी एक कारण म्हणजे कसोटी संघातील हरभजन सिंग व रिद्धिमान साहा यांच्यासारखे खेळाडू मायदेशी परतणार आहेत.’ तीन सहायक प्रशिक्षकांसह भारताचा ज्युनिअर संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त आहे. शास्त्री श्रीलंका दौऱ्यावर संघाचा कार्यभार सांभाळतील. सूत्राने सांगितले की, अद्याप काहीच निश्चित नसून बीसीसीआयमध्ये यावर चर्चा सुरू आहे. याबाबतचा निर्णय तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेनंतर होईल.
शास्त्रींची संघाला ‘डिनर पार्टी’
By admin | Updated: June 16, 2015 02:00 IST