शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
4
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
5
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
6
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
7
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
8
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
9
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
10
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
11
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
12
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
13
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
14
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
15
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
16
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
17
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
18
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
19
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
20
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
Daily Top 2Weekly Top 5

चीन ओपन बॅडमिंटन; सिंधूचा सलामीला धक्कादायक पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 05:08 IST

४२ व्या स्थानावरील पाइ यूकडून विश्वविजेती ७४ मिनिटात गारद

फुलोऊ (चीन) : विश्व चॅम्पियन पी.व्ही. सिंधू हिला मंगळवारी येथे सुरू झालेल्या चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानावर असलेली चायनीज तैपईची पाइ यू हिच्याकडून अवघ्या ७४ मिनिटात सिंधू १३-२१, २१-१८,१९-२१ अशी पराभूत झाली. सहाव्या स्थानावर असलेली सिंधू याआधी डेन्मार्क आणि कोरिया येथील स्पर्धेतही सलामीला पराभूत झाली होती. पाइ यूविरुद्ध चार सामन्यात सिंधूचा हा पहिला पराभव ठरला. सिंधूने पहिला गेम गमविल्यानंतरही दुसरा गेम जिंकून चुरस वाढविली होती. निर्णायक गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूने सुरुवातीला ८-२ अशी आघाडी मिळविली होती.अनुभवी सिंधूने सलग नऊ गुण संपादन केले पण पाय यू १५-१२ अशी आघाडी कमी करण्यात यशस्वी ठरली. सिंधूला अखेरच्या टप्प्यात सूर न गवसल्याने सामनाही गमवावा लागला.

दुसरीकडे, सात्त्विक साईराज रंकीरेड्डी याने मात्र पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरीत विजय संपादन केले. मागच्या महिन्यात फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठणारे सात्त्विक आणि चिराग यांनी फिलिप च्यू आणि रेया च्यू यांच्यावर २१-९, २१-१५ ने विजय नोंदविला. त्याआधी सात्त्विक आणि अश्विनी पोनप्पा यांनी मिश्र प्रकारात कॅनडाचे जोशुआ हर्लबर्ट यू- जोसेफिन वू यांचा २१-१९,२१-१९ ने पराभव करीत दुसऱ्या फेरीत धडक दिली. (वृत्तसंस्था)प्रणॉयचाही पराभवपुरुष एकेरीत डेंग्यूच्या आजारातून सावरलेला एच. एस. प्रणॉय हा देखील पहिल्या फेरीत डेन्मार्कचा रासमुस गस्के याच्याकडून १७-२१, १८-२१ ने पराभूत झाला. अश्विनी- एन. सिक्की रेड्डी यांना महिली दुहेरीत ३० मिनिटात ली वेन- झेंग वू यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. 

 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton