शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी : मुंबई शहर पुरुष विभागात, तर मुंबई उपनगर महिला विभागाच्या बाद फेरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 14:48 IST

साखळी सामन्यातील निकाल नंतर पुरुष विभागात रायगड, सांगली, मुंबई शहर, ठाणे, कोल्हापूर यांनी बादफेरीतील प्रवेश निश्चित केला.

ठळक मुद्देपुरुष विभागात रायगड, सांगली, मुंबई शहर, ठाणे, कोल्हापूर बाद फेरीतमहिला विभातात पुणे, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी यांची आगेकूच

इस्लामपूर : सांगली येथे जयंत पाटील खुले नाट्यगृह या मैदानात सुरू असलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरुष व महिला गट आंतर राज्य कबड्डी स्पर्धेचे" काळ दुसऱ्या दिवशी झालेल्या साखळी सामन्यातील निकाल नंतर पुरुष विभागात रायगड, सांगली, मुंबई शहर, ठाणे, कोल्हापूर यांनी बादफेरीतील प्रवेश निश्चित केला. तर महिला विभातात पुणे, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या संघांनी बादफेरीत प्रवेश मिळवला आहे.

पुरुष विभागात रायगड संघाने आपल्या तिसऱ्या साखळी सामन्यात अमरावती चा ४०-१३ गुणांनी पराभव करत तीन विजयासह गटात अव्वाल स्थान मिळवले. तर यजमान सांगली ने कोल्हापूरचा १४-११ असा पराभव करत तिसऱ्या विजयासह बादफेरीत प्रवेश मिळवला.महिला विभागात पुणे विरुद्ध ठाणे याच्यात चांगला चुरशी सामना झाला. मध्यंतरा पर्यत पुणे कडे १८-१६ अशी नाममात्र आघाडी होती. पुणे कडून आम्रपली गलांडे चांगला खेळ करत पुणेला ३४-२५ असा विजय मिळवून दिला. साखळीतील तीन विजयासह पुणेने बादफेरीत प्रवेश मिळवला.

महिला विभागात मुंबई उनगरने नागपूरचा ३०-०४ असा सहज पराभव करत साखळीतील तिसरा विजय मिळवला. तसेच कोल्हापूर विरुध्द पालघर यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरापर्यत १६-१२ अशी आघाडी पालघर कडे होती. पालघर कडून लता पांचाल व ऐश्वर्या काळे यांनी चांगला खेळ करत ३४-३२ विजय मिळवत तिसरा साखळी सामना जिंकला.

आज होणाऱ्या साखळी सामन्यानंतर बादफेरीचा चित्र स्पष्ट होईल. महिला विभागात ठाणे विरुद्ध सातारा, रायगड विरुद्ध नाशिक, कोल्हापूर विरुद्ध सिंधुदुर्ग आणि मुंबई शहर विरुद्ध अहमदनगर हे चारही निर्णायक सामने आज होतील. तर पुरुष विभागात नंदुरबार विरुद्ध बीड, ठाणे विरुद्ध पुणे, मुंबई उपनगर विरुद्ध नाशिक हे साखळीतील सामने निर्णायक असतील.

टॅग्स :Kabaddiकबड्डी