शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

घड्याळाचे काटे फिरले अन् प्रज्ञाननंदाने पहिला टाय ब्रेकर सोडला; मॅग्नस कार्लसनची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:40 IST

Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : आर प्रज्ञाननंदाने बुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये नंबर १ मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली आहे.

Fide World Cup Final R Praggnanandhaa vs Magnus Carlsen : भारताचा १८ वर्षीय बुद्धीबळपटूआर प्रज्ञाननंदानेबुद्धीबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये नंबर १ मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली आहे. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना प्रज्ञाननंदाने पहिला सामना ड्रॉ सोडवला, तर दुसऱ्या सामन्यात कार्लसनकडे पांढऱ्या मोहऱ्यांचे अडव्हांटेज असूनही भारताच्या युवा खेळाडूने ड्रॉवर समाधान मानण्यास भाग पाडले.त्यामुळे फायनल २५-२५ मिनिटांच्या रॅपिड गेममध्ये गेली आणि प्रज्ञाननंदाने पांढऱ्या मोहऱ्यांसह आज सुरूवात केली. पण, ही लढत अटीतटीची झाली. आघाडीवर असलेल्या प्रज्ञाननंदाला कार्लसनने वेळेच्या जोरावर पहिल्या टाय ब्रेकरमध्ये हार मानन्यास भाग पाडले. 

Blog: १८ व्या वर्षी तो जग जिंकायला निघाला! प्रज्ञाननंदा सामान्य कुटुंबातील असामान्य मुलगा

प्रज्ञाननंदा शांत डोक्याने एकेक चाल आखत होता अन् कार्लसनला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करताना दिसला. ११व्या  प्रज्ञाने वझीर बाहेर काढला, तर पुढच्या चालीत कार्लसननेही वझीर बाहेर काढला.  १४व्या चालीत प्रज्ञाने त्याच्याच्या वझारीची G5 चाल खेळली अन् कार्लसन गोंधळलेला दिसला. १८व्या चालीत दोघांनी एकमेकांचे वझीर मारले. कार्लसनने उत्तम बचावाचा नमूना सादर केला. पण, कार्लसनचा निर्धारित वेळ संपत चालला होता आणि त्यामुळे तो दडपणात जाताना दिसला. २५व्या चालीनंतर कार्लसनकडे ४.४८ मिनिटे होती, तर प्रज्ञाननंदाकडे ६ मिनिटांचा अडव्हाटेंज होता. 

बचावात्मक पवित्र्यात गेलेल्या कार्लसनला २९व्या चालीत प्रज्ञाननंदाने g4चाल करून अचंबित केले. प्रज्ञाननंदाने आक्रमक खेळ केला. ३३व्या चालीत कार्लसनने त्याचा हत्ती भारतीय खेळाडूच्या हत्तीच्या समोर उभा केला. त्याला अपेक्षित चाल प्रज्ञाननंदाने खेळली अन् हत्तीचा बळी देऊन कार्लसनने घोडा वाचवला. पण, आता घड्याळाचे काटे फिरले अन् कार्लसनकडे अडीच मिनिटांचा वेळ शिल्लक होता, तर प्रज्ञाननंदकडे एक मिनिटांहून अधिक वेळ राहिला होता. तरीही १८ वर्षीय खेळाडूच्या चेहऱ्यावर कुठेच घबराट दिसली नाही. ४७व्या चालीनंतर प्रज्ञाननंदाने वेळेअभावी डाव सोडला अन् कार्लसनने १ गुणाची कमाई केली. आता पुढील टाय ब्रेकरमध्ये प्रज्ञाननंदाला विजय मिळवावा लागणार आहे. 

टॅग्स :R Praggnanandhaaआर प्रज्ञाननंदाChessबुद्धीबळ