शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिबळ : नूबेर शाहला नमवून बेलारूसचा अलेक्सेज आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 21:27 IST

बेलारूसच्या मलाखातको वडीम विरुद्ध द्वितीय मानांकित अमानतोव फारुख यामधील साखळी सामना ६ तासांच्या विक्रमी १७८ चालीनंतर बरोबरीत संपला.

मुंबई : महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय  मास्टर नूबेरशाह शेखचा (इलो २४३६) सहावा मानांकित बेलारूसचा ग्रँड मास्टर अलेक्सन्ड्रोव अलेक्सेजने (इलो २५८८) ३३ चालीत पराभव केला आणि १२ व्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय मानांकन अ विभाग बुद्धिबळ स्पर्धेत साखळी ५ गुणासह एकमेव आघाडी घेतली आहे. परिणामी स्पर्धेत अप्रतिम खेळ करणाऱ्या मुंबईच्या नूबेर शाह शेखची विजयीदौड पाचव्या साखळी फेरीत थबकली. बेलारूसच्या मलाखातको वडीम विरुद्ध द्वितीय मानांकित अमानतोव फारुख यामधील साखळी सामना ६ तासांच्या विक्रमी १७८ चालीनंतर बरोबरीत संपला.

          बीकेसी येथे सुरु असलेल्या स्पर्धेमधील पहिल्या पटावर आंतरराष्ट्रीय  मास्टर नूबेर शाह शेख विरुद्ध बेलारूसचा अलेक्सन्ड्रोव अलेक्सेज यामधील लढत एकतर्फी करण्यात अलेक्सेजचे डावपेच यशस्वी ठरले. क्वीन गँबित डिक्लाईंड पद्धतीने सुरु झालेल्या डावात अलेक्सेजने सुरवातीपासूनच वर्चस्व मिळविले.  डावाच्या मध्यातही एकापेक्षा एक उत्तम चाली रचून त्याने सर्व चाहत्यांची वाहवा मिळवली. २३ व्या चालीला नूबेरने केलेल्या वजिराच्या चुकीच्या चालीचा त्याने पुरेपूर फायदा उठविला. हत्तीची सुयोग्य चाल करून डावावरची पकड अलेक्सेजने अधिक मजबूत केली. आपल्यावर झालेल्या आक्रमणावर बचावाचा कोणताही मार्ग  न सापडल्याने शेवटी ३३ व्या चालीत नूबेरने पराभव मान्य केला. तसेच अनुभवी अलेक्सेजने डावानंतर आपल्या प्रतिस्पर्ध्याला त्याच्या चुका मैत्रीपूर्ण रीतीने दाखवत उत्कृष्ठ खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. बेलारूसच्या मलाखातको वडीम विरुद्ध द्वितीय मानांकित अमानतोव फारुख यांचा सामना दुसऱ्या पटावर विक्रमी १७८ चालीनंतर बरोबरीत सुटला.किंग्स इंडियन बचाव पद्धतीने सुरु झालेला हा सामना तब्बल ६ तास चालला. 

टॅग्स :Chessबुद्धीबळMumbaiमुंबईMayorमहापौर