शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
5
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
6
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
7
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
8
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
9
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
10
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
11
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
12
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
13
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
14
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
15
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
16
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
17
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
18
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
19
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

पंजाबसमोर चेन्नईचे आव्हान

By admin | Updated: May 16, 2015 02:25 IST

आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ आणि दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज शनिवारी आयपीएल-८ च्या अखेरच्या लढतीत प्ले आॅफबाहेर

मोहाली : आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ आणि दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज शनिवारी आयपीएल-८ च्या अखेरच्या लढतीत प्ले आॅफबाहेर झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला नमवून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याच्या इराद्याने उतरणार आहे.उभय संघांत आतापर्यंत जे १६ सामने झाले त्यांत चेन्नईने ८ सामने जिंकले. सहा सामन्यांत पंजाबला विजय मिळाला. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. सध्याच्या स्पर्धेत २५ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबला ९७ धावांनी धूळ चारली होती.दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून पराभूत झालेला चेन्नई संघ उद्या पंजाबला कमकुवत मानण्याची मात्र चूक करणार नाही. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २२ धावांनी विजय साजरा केल्यानंतर उत्साहाचा संचार झालेला पंजाब चेन्नईचे गणित चुकविण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आकडेवारीवर नजर टाकल्यास चेन्नईचे पारडे जड वाटते. आयपीएल-७ मध्ये उभय संघ तीन सामन्यांत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. त्यात चेन्नईला एकही विजय साजरा करता आला नाही. क्लालिफायरमध्ये पंजाबने चेन्नईवर २४ धावांनी विजय साजरा केला होता. त्याआधी कटकमध्ये झालेल्या लढतीतही पंजाबने ४४ धावांनी सरशी साधली होती. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ १३ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुण घेऊन आघाडीवर आहे. पंजाब संघ १३ पैकी १० सामन्यांत पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर झाला. पंजाबला घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ मिळू शकतो; मात्र चेन्नईचे खेळाडू कुठल्याही मैदानावर खेळून विजय खेचून आणतात. चेन्नईचा बें्रडन मॅक्युलम हा धावा काढण्याशिवाय क्षेत्ररक्षणातही अप्रतिम कामगिरी करीत आहे. त्याने १३ सामन्यांत ४३० धावा केल्या. पंजाबचा एकमेव फलंदाज डेव्हिड मिलर याने १२ सामन्यांत ३४६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ड्वेन ब्राव्हो आयपीएलच्या आठव्या पर्वात सर्वाधिक १९ गडी बाद करणारा गोलंदाज बनला. पाठोपाठ आशिष नेहरा १७ गडी बाद करून दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचे गोलंदाज अनुरितसिंग व अक्षर पटेल यांनी क्रमश: १५ आणि १३ गडी बाद केले. चेन्नई गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही आघाडीवर आहे. मॅक्युलमशिवाय धोनी, ब्राव्हो आणि डुप्लेसिस, सुरेश रैना, जडेजा व आश्विन हे सर्व जण धावा काढण्यात पटाईत मानले जातात. (वृत्तसंस्था)