शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

चामीराचे पाच बळी, न्यूझीलंड बॅकफूटवर

By admin | Updated: December 20, 2015 02:52 IST

युवा वेगवान गोलंदाज दुष्यंत चामीराच्या भेदक माऱ्याच्या बळावर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले.

हॅमिल्टन : युवा वेगवान गोलंदाज दुष्यंत चामीराच्या भेदक माऱ्याच्या बळावर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. चामीराने करियरमध्ये पहिल्यांदा ४७ धावांत पाच गडी बाद केले. त्यामुळे लंकेच्या पहिल्या डावातील २९२ धावांना उत्तर देणाऱ्या न्यूझीलंडची स्थिती बिनबाद ८१ वरून दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा ९ बाद २३२ अशी झाली. ड्रग ब्रेसवेल ३० धावांवर नाबाद आहे. नील वेगलर १७ धावा काढून अखेरच्या चेंडूवर बाद झाला. २० वर्षांच्या चामीराने पहिल्या स्पेलमध्ये १७ धावांत तीन आणि दुसऱ्या स्पेलमध्ये ३० धावांत दोन गडी बाद केले. ६७ वा सामना खेळणाऱ्या रंगना हेरथने ७५ धावांत दोन गडी बाद केले. मार्टिन गुप्तिल आणि टॉम लेंथम यांनी सलामीला ८१ धावा केल्या. यानंतर चामीरा आणि हेरथ यांनी चार षटकांत आठ धावांत चार गडी बाद केले. मार्टिनने गुप्तिलने अर्धशतक ठोकले. मिशेल सेंटनर ३८ आणि वाटलिंग २८ यांनी चांगली भागीदारी केली; पण मोठी खेळी करू शकले नाहीत. त्याआधी लंकेने कालच्या धावसंख्येत २८ धावांची भर घातली, तोच त्यांचा पहिला डाव आटोपला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक ७७ धावांचे योगदान दिले. टीम साऊदी याने लॅथमकरवी मॅथ्यूजला तिसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद केले. (वृत्तसंस्था)धावफलक :श्रीलंका पहिला डाव ८०.१ षटकांत सर्वबाद २९२, कुसल मेंडिस झे.वॅटलिंग गो.साउथी ३१, उदारा जयसुंदेरा धाव बाद सेन्टनर/वॅटलिंग २६, दिनेश चंडिमल झे.वॅटलिंग गो.ब्रेसवेल ४७, अँजेलो मॅथ्युज् झे. लॅथम गो.साउथी ७७, मिलिंदा श्रीवर्धना झे. टेलर गो. बोल्ट ६२, नुवान प्रदीप नाबाद २, ट्रेंट बोल्ट २/५१, टीम साउथी ३/६३, डग्लस ब्रेसवेल २/८१.न्युझिलंड - पहिला डाव ७८.४ षटकांत ९ बाद २३२, मार्टिन गुप्तील झे. मॅथ्युज् गो. हेराथ ५०, टॉम लॅथम झे.करुणारत्ने गो. चमिरा २८, मिशेल सॅन्टनर झे. चंडिमल गो. प्रदीप ३८, ब्रॅडली जॉन वॅटलिंग झे. विथांगे गो. लकमल २८, डग्लस ब्रेसवेल नाबाद ३०, नील वॅग्नर झे. विथांगे गो. चमिरा १७, रंगना हेराथ २/७५, दुशमंथा चमिरा ५/४७.