शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘खेलो इंडिया’ विजेत्यांना रोख पुरस्कार, क्रीडामंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 01:36 IST

महाराष्टÑाच्या ५९० खेळाडूंनी २० पैकी १९ खेळात स्पर्धेत भाग घेतला होता.

नागपूर : गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान पटकविणाºया महाराष्टÑातील ३९९ खेळाडूंना एकूण ३ कोटी ६ लाख २५ हजार रूपयांचे रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत.वैयक्तिक तसेच सांघिक प्रकारात सुवर्ण विजेत्या ७८ खेळाडूंना प्रत्येकी १ लाख, रौप्य विजेत्या ७७ खेळाडूंना प्रत्येकी ७५ हजार आणि कांस्य विजेत्या १०२ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजाराचा रोख पुरस्कार दिला जाईल. खेळाडूंचा गौरव सोहळा मुंबईत लवकरच होणार असून त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून सोहळ्याची तारीख निश्चित करणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सोमवारी नागपुरात दिली.महाराष्टÑाच्या ५९० खेळाडूंनी २० पैकी १९ खेळात स्पर्धेत भाग घेतला होता. राज्याने सर्वाधिक ४६ पदकांची कमाई जलतरणात केली असून जिम्नॅस्टिक्समध्ये ४०,कुस्तीमध्ये ३१, अ‍ॅथलेटिक्समध्ये २९ आणि वेटलिफ्टिंगमध्ये २५ पदकांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागपूर विभागातील २० खेळाडूंचा पदक विजेत्यांमध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘२०१२ ला क्रीडा धोरणाचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारसीनुसार बºयाच गोष्टी अपेक्षित होत्या, मात्र आधीच्या शासनाकडून अनेक गोष्टींची प्रत्यक्षात अंमलबजावणी का झाली नाही, याचा आढावा लवकरच घेण्यातयेईल.’नागपूर विभागात सहसंचालकाचे पद असावे, अशी अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. याकडे लक्ष वेधले असता क्रीडामंत्र्यांनी यासंदर्भात शासनस्तरावर निर्णयासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.

- गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राने पहिल्यांदा सांघिक जेतेपद पटकावले होते. यंदा गुवाहाटीत आपले जेतेपद कायम राखताना महाराष्ट्राने हरयाणाला रोखले.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया