शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र क्रीडा प्रकारातून 'कॅरम'ला वगळलं; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 19:10 IST

शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून कॅरम खेळाला वगळल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबई: महाराष्ट्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून कॅरम खेळाला वगळल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कॅरमसह शरीरसौष्ठव, बिलियर्डस-स्नूकर, अश्वारोहण, गोल्फ, आदी खेळांना देखील यात स्थान मिळाले नाही. कॅरम खेळाची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची १४ ऑगस्ट १९५४ रोजी स्थापना झाली. तेव्हापासून ही संस्था या खेळाला न्याय देण्यासाठी लढा देत आली आहे. भारतीयांनी क्रिकेटपेक्षा जास्त कोणत्याच खेळावर प्रेम केलं नाही. क्रिकेट म्हणजे भारतात जणू काही एक धर्मच... या धर्माचे कोट्यवधी चाहते आहेत. पण, कॅरम हा खेळ देखील मागे नसून महाराष्ट्राने आतापर्यंत ३ वर्ल्ड चॅम्पियन, सुमारे ३० आंतरराष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू, १५ पुरुष आणि महिला वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन, १२ पुरुष आणि महिला वेटरन नॅशनल चॅम्पियन, ३० कॅडेट, सब-ज्युनियर, ज्युनियर आणि यूथ नॅशनल चॅम्पियन तसेच सुमारे २५ शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिलेदार तयार केले आहेत. तसेच आगामी काळात देखील महाराष्ट्राचा डंका देशभर पोहचवतील अशा खेळाडूंची भर पडणार आहे. याशिवाय महाराष्ट्राने जवळपास ४० आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पंच तयार केले आहेत.

महाराष्ट्र सरकारचा निर्णय महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने मागील आठ वर्षांत आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह सुमारे १२ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा प्रत्येक क्रीडा वर्षात आयोजित केल्या आहेत. MCA ने २०१३ मध्ये आपली वेबसाईट लॉन्च केली. अधिकाधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याद्वारे हळूहळू या खेळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी समालोचनासह सामन्यांचा थेट प्रवाह सुरू करण्यात आला. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांना या खेळाशी जोडण्याचा प्रयत्न केला. देशासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू तयार करणे हे या असोसिएशनचे प्रमुख ध्येय आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांनी यांनी कॅरम आणि खेळाडूंच्या सर्वांगीण हिताच्या विरोधात असलेल्या या चुकीच्या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे सध्याचे जागतिक विजेते संदीप दिवे, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेले निलम घोडके आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजीत त्रिपाणकर यांना २०२३-२४ या वर्षाच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून वंचित राहावे लागणार आहे. कॅरम खेळाच्या दृष्टीने हे अजिबात चांगले नाही. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने प्रत्येक कॅरम खेळाडू, अधिकारी, पंच आणि कॅरमप्रेमींना विनंती करतो की, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी योग्य पद्धतीने आणि योग्य व्यासपीठावर लढा द्यावा आणि आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडून निषेध दरम्यान, आपले खेळाडू आपल्या देशाचा गौरव करण्यासाठी आपले सर्वस्व देत आहेत आणि दुसरीकडे खेळाडूंना सरकार स्तरावरून अशी वागणूक मिळत आहे. हे कृत्य केवळ आपल्या राज्याच्या क्रीडा संस्कृतीलाच हानिकारक नाही तर आपल्या खेळाडूंच्या मनोधैर्यावरही परिणाम करणारे आहे. खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या अशा कृत्याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आम्ही लढणार असून, माघार न घेणार नाही, असेही महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सचिवांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार