शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कॅरम : अमोल, योगेश, सलमान, मयूर यांची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 20:18 IST

रिझर्व्ह बँकेच्या हिदायत अन्सारीचा २५-१४, ५-१४ असा फाडशा पाडत स्पर्धेत मोठी खळबळ माजवत तिसरी फेरी गाठली. 

मुंबई : बॉम्बे वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) तर्फे आयोजित सातव्या मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन रोख पारितोषिकांच्या कॅरम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अमोल सावर्डेकरने सरळ दोन गेममध्ये माजी सार्क व एशिआई कॅरम विजेता रिझर्व्ह बँकेच्या हिदायत अन्सारीचा २५-१४, ५-१४ असा फाडशा पाडत स्पर्धेत मोठी खळबळ माजवत तिसरी फेरी गाठली. दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या सामन्यात वरळी स्पोर्टस क्लबच्या सलमान खानने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू ओमकार नेटकेचा २१-२५, २५-११, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढली. दुसऱ्या एका तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत ए. के. फाऊंडेशनच्या अमोल चरकरीने बोरिचा स्पोर्टस्‌ क्लबच्या नटवर राठोडला २५-८, १८-२५, २५-१६ असे निष्प्रभ करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. ही स्पर्धा मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशनच्या विद्यामाने वाय. एम. सी. ए. (प्रोक्टर ब्रँच) हॉल, उमरभाई पथ, आग्रीपाडा येथे वाय. एम. सी. ए. चे कार्याध्यक्ष श्री. शरद कांगा, प्रोग्रॅम कमिटी चेअरमन पीटर सेबॅस्टीयन, सरचिटणीस श्री. पॉल जॉर्ज व प्रोक्टर ब्रँच वाय. एम. सी. ए. चे चिटणीस श्री. भास्कर कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नीट आणि नेटक्या पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे सहकार्य लाभले आहे. जैन इरिगेशनचा माजी राष्ट्रीय विजेता योगेश डोंगडेने एकतर्फी सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शांतिलाल जितियाचा २५-१, २५-४ असा फाडशा पाडत विजयी कूच केली. बोरिचा स्पोर्टस्‌ क्लबच्या मयूर शिशुपालने दोन गेम रंगलेल्या लढतीत वायएमसीएच्या मोहम्मद अतानियावर २५-१३, २५-१७ असा विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजेश खेडेकरने बेस्टच्या सुधीर कांबळेवर २५-०, २५-० असा सहज विजय मिळवित तिसरी फेरी गाठली. वायएमसीएच्या मोहम्मद सलिमने सरळ दोन गेममध्ये माजी राष्ट्रीय युवा विजेता सुरज कुंभारचा २५-१८, २५-८ असा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.  या स्पर्धेत आतापर्यंत ३ ब्रेक टू फिनिश आणि २ ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक