शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! भवानी देवीने रचला इतिहास; आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 12:54 IST

Asian Fencing Championships : भवानी या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली आहे. 

नवी दिल्ली : ऑलिम्पियन तलवारबाज सीए भवानी देवीने आशियाई अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले. विशेष बाब म्हणजे भवानी या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली. चीनच्या वुक्सी प्रांतात रंगलेल्या या स्पर्धेच्या सायबर प्रकारात उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या झेनाब डेयिबेकोवा हिने भवानीला १५-१४ असे नमवले. या पराभवासह भवानीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी भवानीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत गत विश्वविजेती जपानची मिसाकी एमुराचा पराभव करत ऐतिहासिक पदक निश्चित केले होते. 

भवानीला राउंड ऑफ ६४ फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर पुढील फेरीत तिने कझाखस्तानची डोस्पे करिनाचा पराभव केला. उप-उपांत्यपूर्व लढतीत तिने तिसरी मानांकित ओजाकी सेरी हिचा १५-११ असा पराभव केला होता.  उपांत्य फेरीत अटीतटीच्या लढतीत एका गुणाने भवानी माघारल्यामुळे तिच्या कामगिरीत झपाट्याने सुधारणा घडून येत असल्याचे मानले जात आहे. भवानी देवीच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील भवानीच्या यशाचे कौतुक केले. 

भवानी देवीचे सर्वत्र कौतुक "अभिमानास्पद कामगिरी! २७ ऑगस्ट १९९३ला चेन्नई येथे जन्मलेली भवानी २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली होती. आठवेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेली भवानी देवी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा पहिला सामना जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली", असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेIndiaभारत