शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भारताची सिंधू जागतिक स्पर्धेत पहिल्याच फेरीत गारद; जपानच्या खेळाडूचं एकतर्फी वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 21:04 IST

BWF World Championships 2023 : सध्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा थरार रंगला असून मंगळवारी भारताची शिलेदार सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. 

सध्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा थरार रंगला असून मंगळवारी भारताची शिलेदार सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. आज माजी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन्स पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहारा आमनेसामने होत्या. सुरूवातीपासूनच वर्चस्व राखलेल्या जपानच्या नोझोमीने भारतीय स्टार सिंधूला पराभवाची धूळ चारली. खरं तर मागील वर्षभरापासून सिंधूची गाडी विजयाच्या पटरीवरून खाली उतरल्याचे दिसते. पहिल्या गेममध्ये जपानच्या खेळाडूनं मोठी आघाडी घेतली. १४-२१ अशा फरकानं नोझोमीनं बाजी मारली अन् सिंधू ७ गुणांनी पिछाडीवर राहिली. 

दुसऱ्या गेममध्ये देखील जपानच्या खेळाडूचा वरचष्मा पाहायला मिळाला. पुनरागमनाच्या प्रयत्नात असलेल्या सिंधूला पुन्हा एकदा अपयश आलं आणि ती १४-२१ अशी पिछाडीवर राहिली. सिंधूला जपानच्या ओकुहाराकडून २१-१४, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे पहिला गेम गमाविल्यावरही दुसऱ्या गेमला ९-० अशी मोठी आघाडी मिळवूनही सिंधूला नंतर केवळ पाचच गुण मिळविता आले अन् जपानच्या खेळाडूनं तोंडचा घास पळवला. ही जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची २८ वी आवृत्ती आहे, जी २१ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान कोपनहेगन, डेन्मार्क येथे खेळवली जात आहे. 

सर्वाधिक पदकं सिंधूच्या नावावर भारताच्या सिंधूने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. २०१९ मध्ये सिंधूने महिला एकेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूला काही खास कामगिरी करता आली नाही, तिला एकही पदक जिंकता आलं नाही.  भारताने १९७७ पासून जागतिक स्पर्धेत एक सुवर्ण, चार रौप्य आणि १३ पदके जिंकली आहेत.  

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintonJapanजपान